UGC on Pakistan Degree : पाकिस्तानमधून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात मिळणार नाही रोजगार, UGC चा निर्णय
UGC on Pakistan Degree : पाकिस्तानमधून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे भारतात रोजगार मिळणार नाही. UGC ने नुकताच याबाबतचा निर्णय घेतला आहे.

UGC on Pakistan Degree : पाकिस्तानमधून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे भारतात रोजगार मिळणार नाही. विद्यापीठ अनुदान आयोग ( UGC) आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने नुकतीच याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. पाकिस्तानमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती यूजीसीकडून देण्यात आली आहे.
यूजीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पाकिस्तानमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात नोकसाठी पात्र मानले जाणार नाही. मात्र, पाकिस्तानातून भारतात येणारे निर्वासित आणि त्यांच्या भारतीय नागरिकत्व मिळालेल्या मुलांना या निर्बंधातून सूट देण्यात येणार आहे. पाकिस्तानातून भारतात येणारे निर्वासित आणि भारतीय नागरिकत्व असलेल्या त्यांच्या मुलांना भारतात रोजगाराची संधी दिली जाईल. अॅडव्हायझरीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानात जाण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
UGC & AICTE has advised students not to travel to Pakistan for pursuing higher education. pic.twitter.com/L1vl5XmotQ
— ANI (@ANI) April 23, 2022
भारतीय विद्यापीठ अनुदान आयोग हा केंद्र सरकारचा एक आयोग आहे. यूजीसीद्वारे विद्यापीठाला मान्यता दिली जाते. यूजीसीद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठे आणि महाविद्यालयांना अनुदान देखील दिले जाते. भारतातील नोकऱ्यांसाठी पाकिस्तानमधील पदव्या वैध नसल्याचा आदेश आल्यानंतर काश्मीरमधील एका रहिवाशाने सांगितले की, सरकारी आदेशानंतर आता आम्हाला आमच्या मुलांच्या भवितव्याची काळजी वाटत आहे. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांचा मुलगा चार वर्षांपूर्वी पाकिस्तानात गेला होता. तो आता भारतात परतला तर त्याला येथे नोकरी मिळणार नाही.
पाकिस्तानमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पाकिस्तान सरकार शिष्यवृत्ती आणि आरक्षण देते. जम्मू आणि काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी पाकिस्तानकडून दरवर्षी 600 जागा राखीव ठेवण्यात येतात.
महत्वाच्या बातम्या
SSC MTS 2021 Tier 2 Exam : या दिवशी SSC MTS टियर-2 परीक्षा होणार आहे, ही महत्वाची माहिती
Air India Recruitment 2022 : एअर इंडियामध्ये बंपर भरती! अर्ज करण्याची आज शेवटची तारीख, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI























