AIIMS Jobs 2022 : परीक्षा न देता नोकरीची संधी, 2.20 लाखांपर्यंत पगार
AIIMS Recruitment 2022 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच AIIMS देवघरने विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
AIIMS Recruitment 2022 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच AIIMS देवघरने विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. उमेदवार एम्स पटनाच्या अधिकृत aiimspatna.org या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख अर्ज निघाल्यानंतर तीस दिवस असेल. वैदकीय क्षेत्रात नोकरी शोधत असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियातून (AIIMS Recruitment 2022) विविध 120 जागा भरण्यात येणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अर्ज करु शकतात. ऑनलाईन जमा केलेला अर्ज स्पीड पोस्टाद्वारे एम्स पटना, फुलवारीशरीफ, पटना-801507 या पत्यावर पाठवावा.
कोणत्या पदांसाठी भरती निघाली आहे?AIIMS Vacancy 2022 Details
प्राध्यापक : 28 पद
अतिरिक्त प्राध्यापक : 23 पद
असोसिएट प्राध्यापक : 24 पद
सहायक प्राध्यापक : 45 पद
एकूण जागा - 120 पद
कोण करु शकते अर्ज -
प्राध्यापक आणि अतिरिक्त प्राध्यापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 58 वर्षांपेक्षा जास्त नसावे. असोसिएट प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
सातव्या वेतन आयोगानुसार पगार - (Pay Scale)
प्रोफेसर : 168900 रुपये ते 220400 रुपयांपर्यंत
अॅडिशनल प्रोफेसर: 148200-211400 रुपयांपर्यंत
असोसिएट प्रोफेसर: 138300-209200 रुपयांपर्यंत
असिस्टेंट प्रोफेसर: 101500-167400 रुपयांपर्यंत
कशी होईल निवड -
सर्व अर्जांची पडताळणी केल्यानंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीला बोलवण्यात येईल. मुलाखतीच्या आधारावर निवड करण्यात येणार आहे. निवड करताना रिसर्च, पब्लिकेशन्स, अॅकेडमिक अवॉर्ड, रिसर्च पेपरसह मुलाखतीतील कामगिरीचा विचार केला जाणार आहे.
नोकरीचे नोटेफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra National Law University : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च असिस्टंट पदासाठी भरती; असा करा अर्ज
- Jobs : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदासाठी बंपर भरती, जाणून घ्या सर्व माहिती
- Bank Job 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये SO पदांसाठी मेगा भरती; पदवीधर अर्ज करू शकतात
- RBI Assistant 2022 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 950 सहाय्यक पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI