Crime News: यवतमाळमध्ये जंगलात राहणाऱ्या कुटुंबावर सशस्त्र दरोडा; 30 लाखांची रोकड, 20 तोळं सोनं लुूबाडलं
Yavatmal Crime : महागांव तालुक्यातील पांडे कुटुंबीयांवर सशस्त्र दरोडा. तब्बल 30 लाख रुपयांची रोकड आणि 20 तोळे सोनं दरोडेखोरांनी लुटून नेलं.
Crime News: यवतमाळ: यवतमाळच्या (Yavatmal Latest News) महागांव तालुक्यात (Mahagaon Taluka) राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. महागांव तालुक्यातील चिल्ली ईजारा (Chilli Ijara) येथील जंगलात वास्तव्यास असलेल्या पांडे कुटुंबियांच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यात तब्बल 30 लाख रुपयांची रोकड आणि 20 तोळे सोनं दरोडेखोरांनी लुटून नेलं (Looted By Robbers) आहे. यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळत आहे.
महागांव तालुक्यातील सशस्त्र दरोड्याची ही सर्वात मोठी घटना मानली जात आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस आधिकारी हनुमंत गायकवाड यांच्यासह डॉग युनिट, फिंगर प्रिंट यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पांडे कुटुंबीय शेतकरी असून महागांव तालुक्यातील चिल्ली ईजारा येथील जंगलात गेल्या 60 वर्षांपासून वास्तव्य करतंय. जंगलात त्यांचा एक मोठा वाडा आहे. तसेच, त्यांची वडिलोपार्जित 50 एकर शेती आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पांडे कुटुंबानं कापूस विकला होता. कापूस विकून मिळालेली रक्कम आणि घरातील सोनं असा ऐवज पांडे कुटुंबाच्या घरातील कपाटात ठेवण्यात आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास 6 दरोडेखोर झाडावर चढून भिंतीच्या साहाय्यानं वाड्यात घुसले. वाड्यात संतोष पांडे आणि त्यांच्या दोन बहिणी राहत होत्या. दरोडेखोरांनी सर्वात आधी संतोष आणि त्यांच्या बहिणीला मारहाण केली. बंदूक आणि त्यानंतर तलवारीच्या धाकावर कपाटातील रोख रक्कम आणि सोनं घेऊन पसार झाले. यात संतोष पांडे यांची बहीण करिष्मा पांडे, सविता तिवारी यांना जबर मारहाण करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे कुटुंबियांच्या घरावर ज्या दरोडेखोरांनी दरोडा घातला, ते सर्व दरोडेखोर हिंदी आणि मराठीत बोलत होते, अशी माहिती पीडित कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकाराची तक्रार पांडे कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस स्थानकात दिली. घटनेची तक्रार संतोष पांडे यांनी महागाव पोलिसांत दिली. महागावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव याप्रकरणी कसून तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
धनंजय मुंडेंच्या कट्टर समर्थकाच्या नावाने फेक अकाऊंट, वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल