Yavatmal News : किरकोळ वाद विकोपाला, अपमानाचा बदला घेण्यासाठी तरुणीची निर्घृण हत्या; आरोपीस अटक
Yavatmal Crime News : किरकोळ अपघातातील अपमानाचा राग मनात ठेऊन बदला घेण्यासाठी एका तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची बाब उघडकीस आली.
Yavatmal Crime News : आठ महिन्यापूर्वी मृतक धनश्री पेटकर हिने आरोपीच्या गाडीला स्टेट बँक चौकात ठोस मारली होती. यावेळी आरोपीला नागरिकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या अपमानाचा राग मनात ठेऊन बदला घेण्यासाठी आरोपी प्रमोद खोदाणे याने धनश्रीचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची बाब उघडकीस आली. यवतमाळच्या मादनी रोडवरील बोरगाव डॅम जवळील जंगलात या प्रकरणीतील आरोपीने हे कृत्य केलंय. या प्रकरणी आरोपी प्रमोद कोदाने याला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मृतक धनश्री पेठकर ही 5 डिसेंबरला पेपर सुटल्यानंतर घरी परतली नव्हती. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या घटनेनंतर आरोपी प्रमोद कोदाणे याने मृतक धनश्री सोबत जवळीक करीत मैत्री निर्माण केली होती. कॉलेजमध्ये जात-येत असताना बोलचाल करीत असत. घटनेच्या दिवशी तिला कॉलेजमध्ये पेपरदेण्या करिता सोडून दिले आणि 'पेपर किती वाजता संपतो तुला घ्यायला येतो' असे सुद्धा सांगितले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता वाधवाणी कॉलेजमधून मृतक धनश्री बाहेर आल्यावर तीला शेतातील मजुराला पैसे द्यायचे आहे, आपण आधी तिकडे जाऊन येऊ असे सांगितले. यावेळी तीने चल मी पण सोबत येते असे म्हटले.
डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या
दरम्यान, धनश्री पेठकरला गाडीवर बसून बोरगांव घाटात गाडी थांबवली आणि तिला जाब विचारण्यास सुरुवात केली. माझ्यासोबत केलेल्या अपघातामुळे मला लोकांनी मारहाण केली होती. त्याचा राग उकरुन काढत तुझ्यामुळे मला लोकानी मारले व तु सुध्दा नेहमी माझ्याकडे पाहुन हसते आणि मला चिडवतेस, असे म्हणत तिला धकाबुक्की केली. त्यानंतर खाली पाडून जवळ असलेला दगड उचलून प्रमोदने तो तिच्या डोक्यावर टाकून तीची हत्या केली. याप्रकरणी पुढील तपास सध्या ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे. मात्र किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
महिलेला पाहून केले अश्लील कृत्य, दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार
कंबाला हिल येथे महिलेला पाहून अश्लील चाळे करणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला गावदेवी पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपी आग्रा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिला 30 नोव्हेंबरला टॅक्सीतून जात असताना कंबाला हिल बस थांब्याजवळ उभा असलेला एक तरुण पीडित महिलेला पाहून अश्लील चाळे करत होता. पीडित महिलेने याबाबत गावदेवी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांना आरोपी आग्रा येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यानूसार पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीला अटक केली.