एक्स्प्लोर

Ashok Kharat Case: आरोपी परधर्मीय असेल तरच हिंदू जनआक्रोश मोर्चे काढणार का? नितेश राणे, पडळकर, संग्राम जगताप, लांडगे अशोक खरातवर का बोलत नाहीत? शरद पवार गटाच्या नेत्याचा सवाल

Ashok Kharat Case: अशोक खरात हा एकमेव नाही असे अनेक भोंदू बाबा महाराष्ट्रात आणि देशात आहेत जे सर्वसामान्य लोकांचे आणि महिलांचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक शोषण करत असतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई: नाशिकच्या भोंदू 'कॅप्टन' अशोक खरातने (Ashok Kharat Case) हिंदू धर्मातील अनेक महिलांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते विकास लवांडे यांनी हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप नेत्यांच्या 'सोयीच्या' भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला आहे.(Ashok Kharat Case)

भोंदूगिरीवर हिंदुत्ववादी गप्प का?

विकास लवांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात ज्याने हिंदू धर्मातील अनेक महिलांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले , फसवणूक केली. अशोक खरात हा एकमेव नाही असे अनेक भोंदू बाबा महाराष्ट्रात आणि देशात आहेत जे सर्वसामान्य लोकांचे आणि महिलांचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक शोषण करत असतात. मात्र या विषयावर आरएसएस परिवारातील तथाकथित #हिंदुत्ववादी संघटना , बजरंग दल,  भिडेंचे धारकरी आणि भाजपाचे आमदार महेश लांडगे, आमदार गोपीचंद पडळकर,आमदार नितेश राणे,आमदार संग्राम जगताप हिंदू जन आक्रोश मोर्चा कधी काढणार आहात की नाही ?  फक्त आरोपी परधर्मीय असेल तरच मोर्चे काढणार ? उघडा डोळे बघा नीट ! #कॅप्टन_फाईल #BJP #RSS", असंही त्यांनी म्हटलं आहे.

आमदारांना आणि संघटनांना थेट सवाल

लवांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये भाजपचे आमदार आणि विविध संघटनांना टॅग करत थेट जाब विचारला आहे. त्यांनी म्हटले की, आरएसएस (RSS) परिवारातील तथाकथित हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल आणि संभाजी भिडे यांचे धारकरी या विषयावर गप्प का?
आमदार महेश लांडगे, गोपीचंद पडळकर, नितेश राणे आणि संग्राम जगताप हे आता 'हिंदू जन आक्रोश मोर्चा' कधी काढणार आहेत की नाही?(Ashok Kharat Case)

"आरोपी परधर्मीय असेल तरच संताप येतो?"

विकास लवांडे यांनी अत्यंत परखड शब्दात विचारले आहे की, "फक्त आरोपी परधर्मीय असेल तरच मोर्चे काढणार का? उघडा डोळे आणि नीट बघा!" खरात प्रकरणातील पीडित महिला हिंदू असतानाही हिंदुत्वाचा टाहो फोडणारे नेते आता कुठे आहेत, असा सवाल करत त्यांनी #कॅप्टन_फाईल हा हॅशटॅग वापरून भाजपवर निशाणा साधला आहे.(Ashok Kharat Case)

नेमकं काय आहे प्रकरण?

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार  केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Who Is Ashok Kharat : कोण आहे अशोक खरात? 

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget