वर्ध्यात दिवसाढवळ्या रस्त्यावर हत्येचा थरार, दगडाने ठेचून घेतला जीव
Crime News Update : वर्ध्यामध्ये दिवसाढवळ्या रस्त्यावर हत्येचा थरार घडलाय. या धक्कादायक घटनेने देवळी शहर हादरले. पोलिसांनी घटनास्थळावरच हत्या करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.
Wardha Crime News Update : वर्ध्यामध्ये दिवसाढवळ्या रस्त्यावर हत्येचा थरार घडलाय. या धक्कादायक घटनेने देवळी शहर हादरले. पोलिसांनी घटनास्थळावरच हत्या करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचा रेकॉर्ड करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खुलेआम हत्या झाल्याने देवळीत खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
देवळी शहरात सोनेगाव रस्त्यावर पोलीस वसाहतीच्या समोर भरदिवसा एका इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मद्यधुंद असलेल्या एका तरुणाने सोनेगाव आबाजी येथील इसमास दगडाने ठेचून हत्या केली. रस्त्यावर लोकांना पैसे मागत असताना उभ्या असलेल्या महिलेसोबत वाद झाला, महिलेला होत असलेली शिवीगाळ पाहून वाद थांबविण्यासाठी मध्ये आलेल्या सोनेगाव आबाजी येथील 45 वर्षीय इसमाला दगडाने ठेचून ठार केले. रस्त्यावर घडणारा हा थरार लोकांच्या कॅमेरात कैद झाला. याचे विडीओ देखील वर्ध्यामध्ये वेगाने व्हायरल झाले आहेत.
हत्या झालेल्या मृत व्यक्तीचे नाव विनोद डोमाजी भरणे असे असून त्याचे वय 45 वर्ष इतके आहे. आरोपी करण मोहिते हा तरुण देवळी येथील राहणारा आहे. सोनेगाव येथील विनोद डोमाजी भरणे हे काही कामासाठी देवळी येथे आले होते. काम आटोपल्यावर आपल्या गावी परत जाण्यासाठी पोलीस वसाहती समोरील चौकात ऑटोची वाट पहात उभे होते. त्यावेळी करण मोहिते यांने एका महिलेशी वाद घातला. लोकांना पैसे मागत असताना विनोद भरणे यांना देखील पैसे मागितले. आरोपी करण मोहिते हा मद्यधुंद अवस्थेत बळजबरीने विनोद भरणे यांना पैशाची मागणी केली, यावरून काही वाद झाला. विनोद भरणे हे पायदळ गावाकडे निघाले असता करण मोहिते यांनी मागून जाऊन विनोद मोहिते यांच्या डोक्यावर मोठा दगड मारला. विनोद भरणे हे खाली पडताच त्याच्या डोक्यावर करण मोहिते यांने वारंवार दगडाने हल्ला केला. त्यामुळे विनोद भरणे यांचा जागीच मृत्यू झालाय.
दिवसाढवळ्या लोकांच्या समोर क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. यामध्ये एक महिला जखमी झाली असून मीरा शालिक मून असे या महिलेचे नाव असल्याचे कळते. सुनिता वसंतराव ठाकरे या महिलेला हे सर्व हदयविकारक दृश्य पाहून चक्कर आली, त्या बेशुद्ध झाल्या . त्यामुळे तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळीच अटक केली.