एक्स्प्लोर

Crime News : धक्कादायक...! ड्युटीवर गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात दरोडा, दीड लाखांचा ऐवज लंपास

चक्क चोरट्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात दरोडा टाकला आहे. पोलिसांच्या घरातीन दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

Wardha Crime News : वर्धा जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली असून चक्क चोरट्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात दरोडा टाकत दागिने पळविले आहेत. एवढंच नाही, तर चोरट्यांने पोलिसाच्या लहान मुलीच्या गळ्याला चाकूसारखा तुकडा आणि पोटाजवळ लोखंडी सळाख लावत लुटलं आहे. वर्धा जिल्ह्यातील रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करुन घरातील चिमुकलीला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील अंदाजे एक लाख 42 हजार रुपयांचे दागिने घेऊन धूम ठोकली. ही घटना सिंदी मेघे परिसरातील झाडे लेआऊट येथे मध्यरात्री घडली. या घटनेने वर्धा जिल्ह्यात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. 

ओरडायचे नाही, मुलीला चाकू आणि सळाख लावून दिली धमकी :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन छोटेलाल यादव हे रामनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. ते स्टेशन डायरीवर ड्यूटी होते. त्यामुळे ते सोमवारी 11 वाजता पोलीस ठाण्यात कर्तव्यावर गेले होते. घरात पवन यादव यांची पत्नी पूनम, दोन मुली आणी आई होते. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अज्ञात चोरटा दारातून घरात शिरला. त्यानंतर पत्नी पूनम यांना आवाज करायचा नाही, "ओरडायचे नाही, तुमच्याकडे जे काही पैसे, सोनं असेल ते द्या" अशी धमकी दिली. तेवढ्यातच त्याने पवन यादव यांच्या लहान मुलीला उचलून तिच्या गळ्याला चाकूसारखा तुकडा आणि सळाख लावली आणि जे घरात आहे ते दे, नाहीतर  "मुलीच्या पोटात  टाकीन"अशीही धमकी दिली. घाबरलेल्या पूनम यादव यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दोन हार, सोन्याच्या तीन अंगठ्या, सोन्याची चैन, सोन्याचा झुमका, सोन्याचे कानातले, सोन्याचे मंगळसूत्र, असे एकूण एक लाख 42 हजार रुपयांचे दागिने  दरोडेखोरांच्या स्वाधीन केले.

चोरट्याने सोने घेऊन ठोकली धूम :
सोने मिळताच दरोडेखोराने  चिमुकलीच्या गळ्याला लावलेला चाकू आणि सळख काढली आणि तिला मुक्त केलं. त्यानंतर लागलीच सोन्याचा ऐवज बॅगमध्ये भरत दुचाकीने पळाला. पूनम यादव यांनी घटनेची माहिती पती पवन यादव यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करुन अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. मात्र, जनतेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसाच्याच घरी अशाप्रकारे दरोडा पडला हे ऐकून नागरिकांची झोप उडाली आहे. परिणामी सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus : टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी घेतली शपथ; विशेष अधिवेशनापूर्वीच कालिदास कोळंबकरांना मोठी जबाबदारी
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी घेतली शपथ; विशेष अधिवेशनापूर्वीच कालिदास कोळंबकरांना मोठी जबाबदारी
Kaun Banega Crorepati 16 : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
Video : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Mahayuti : गृहखातं कुणाला मिळणार? संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 06 December 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सCM Devendra Fadanvis Interview : मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली मुलाखत EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus : टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी घेतली शपथ; विशेष अधिवेशनापूर्वीच कालिदास कोळंबकरांना मोठी जबाबदारी
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी घेतली शपथ; विशेष अधिवेशनापूर्वीच कालिदास कोळंबकरांना मोठी जबाबदारी
Kaun Banega Crorepati 16 : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
Video : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Video : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या खर्चासाठी घेतला हात आखडता? नाशिक मनपाचा आराखडा 15 हजारांवरुन सात हजार कोटींवर; नेमकं कारण काय?
कुंभमेळ्याच्या खर्चासाठी घेतला हात आखडता? नाशिक मनपाचा आराखडा 15 हजारांवरुन सात हजार कोटींवर; नेमकं कारण काय?
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्क पुन्हा काळ बनून आला; यशस्वी जैस्वाल पहिल्याच बाॅलवर अन् किंग कोहली, राहुलची स्वस्तात शिकार!
मिशेल स्टार्क पुन्हा काळ बनून आला; यशस्वी जैस्वाल पहिल्याच बाॅलवर अन् किंग कोहली, राहुलची स्वस्तात शिकार!
Fake Doctor Racket in Gujarat : गुजरातमध्ये 70 हजारात फेक वैद्यकीय डिग्री देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! 14 बोगस डॉक्टर अटकेत, आठवी पासवाल्याकडूनही उपचार
गुजरातमध्ये 70 हजारात फेक वैद्यकीय डिग्री देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! 14 बोगस डॉक्टर अटकेत, आठवी पासवाल्याकडूनही उपचार
Embed widget