वडिलांकडे सोडतो सांगत अल्पवयीन मुलीला फसवले, दोन वेळा अत्याचार, मालवणीतील तरुणाला अटक
Mumbai Crime : आरोपीने मुलीला अत्याचाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि व्हिडीओ काढले. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर : विरार येथून 15 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपहरण, बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून 20 वर्षीय तरूणाला अटक केली आहे.
वडिलांना ओळखत असल्याचं सांगून फसवलं
आरोपीने पीडित मुलीला तिच्या वडिलांना ओळखत असल्याचे सांगून तिला वडिलांकडे घेऊन जातो असे सांगून मालाड परिसरात घेऊन आला. मालवणी येथील घरी आरोपीने मुलीवर अत्याचार केले. यात वेदनांनी असह्य झालेल्या मुलीला पुन्हा घरी सोडतो असे सांगून दुचाकीने जंगलात नेले आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार केले.
व्हिडीओ काढून जीवे मारण्याची धमकी
याबाबत कोणाला काही सांगितल्यास मुलीला तसेच तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. इतकंच काय तर मुलीची सोशल मिडियावर बदनामी करण्याची धमकी देऊन तिचे व्हिडीओही काढले.
या प्रकारानंतर पीडित मुलीने मालवणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरण, बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून रविवारी आरोपीला अटक केली. आरोपीसोबत आपली पूर्वीची ओळख नसल्याचा दावा पीडित मुलीने केला आहे. वडिलांचा मित्र असून वडिलांकडे सोडण्याचं आश्वासन देऊन आरोपीने पीडित मुलीला मालाड परिसरात आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मालवणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
गर्दुल्ल्याने महिलेच्या पाठीत काचेचा तुकडा खुपसला
मुंबईच्या वरळी सी-फेसवर एक खळबळजनक घटना घडली आहे. यात हातातील छत्री लागल्याच्या रागातून 35 वर्षीय व्यक्तीने महिलेच्या पाठीत काचेचा तुकडा खुपसल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी(19 एप्रिल) वरळी सीफेस परिसरात ही घटना घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
किरकोळ कारणावरून चक्क महिलेवर हल्ला केल्यानंतर जखमी महिलेला तात्काळ परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांनी दिली असता याप्रकरणी पोलिसांनी शोध मोहिम राबवून पाच तासांत आरोपीला अटक केली. मात्र क्षुल्लक कारणातून एका गर्दुल्ल्याने महिलेच्या पाठीत चक्क काचेचा तुकडा खुपसल्याच्या घाटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ही बातमी वाचा:























