एक्स्प्लोर

आमच्या गाडीला कट का मारला? वाद करत ट्रक चालकाची केली हत्या, शेवटच्या काढलेल्या व्हिडीओमुळे आरोपींना अटक

वसईजवळ  मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामागार्गावर घडली आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे त्या ट्रक ड्रायव्हरने आपल्या मोबाईलमध्ये मारेकऱ्याचे व्हिडीओ  आणि कारचा फोटो काढल्याने पोलिसांना आरोपी पकडणं सोपं झालं. 

वसई : नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चारचाकी वाहनाला बसलेल्या कटवरुन झालेल्या वादात एका ट्रक ड्रायव्हरला (Truck Driver Murder) आपला जीव गमवावा लागला. ट्रक ड्रायव्हरने काढलेल्या शेवटच्या त्या मोबाईल क्लिपवरुन आरोपींची कार आणि त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. सध्या याप्रकरणी नायगाव पोलिसांनी (Vasai News) चौघांना अटक केली आहे. 

आजच्या या वर्दळीच्या आणि रहद्दारीच्या रस्त्यावर कधी कुठल्या गाडीला धडक बसेल, कट लागेल हे सांगता येणार नाही. माञ या किरकोळ कारणावरुन कुणी चक्क वाहनचालकाला ठार मारेल हे माञ भयावहक आहे. ही  घटना वसईजवळ  मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामागार्गावर घडली आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे त्या ट्रक ड्रायव्हरने आपल्या मोबाईलमध्ये मारेकऱ्याचे व्हिडीओ आणि कारचा फोटो काढल्याने पोलिसांना आरोपी पकडणं सोपं झालं. 

ट्रकचे नुकसान करत केली मारहाण

मयत रामकिशोर पुशवाह असं 40 वर्षीय ट्रक  चालकाचे नाव आहे. रविवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान तो कंपनीचा गॅसने भरलेल्या टँकर घेऊन मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरुन गुजरातच्या दिशेने जात होता. मालजीपाडा येथे ब्रिजखाली एका चारचाकी वाहनाला त्याच्या गाडीचा  कट लागला.  या कटमध्ये कारचे थोडे नुकसान झाले. मात्र वाहनातील चौघांनी रामकिशोर यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र रविवार असल्याने कंपनी बंद आहे. सोमवारी कंपनीत बोलून भरपाई दिली जाईल, तुम्ही इन्शुरन्स क्लेम करा असं रामकिशोर यांनी सांगितल्यावरही कारमधील चौघांचही समाधान झालं नाही. त्यानंतर चौघे कारमधून खाली उतरले आणि रामकिशोरच्या ट्रकच्या दगडाने काचा फोडल्या आणि त्याल याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत उपाचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 

 घटनेनंतर चौघेही आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा कलम 304 , 427, 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सोमवारी दुपारी सर्बेस्टीन कृष्णा वालतुपरमबिल, उत्सव ब्रिजकुमार शर्मा, विकी अशोक बारोट आणि विवेक महेंद्र पवार या चौघांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी नालासोपारा येथे  राहणारे आहेत. 

हे ही वाचा :                                           

Pune Crime News : भर रस्त्यात सपासप वार करुन हत्या; अखेर 36 तासांत पोलिसांनी केला हत्येचा उलगडा, नेमकं काय आहे कारण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget