Nilesh Chavan Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण आठवडाभरापासून फरार; राज्यासह देशभरात पोलिसांकडून शोध सुरु
Nilesh Chavan Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण आठवडाभरापासून फरार आहे.

Nilesh Chavan Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane Death Case) प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण आठवडाभरापासून फरार आहे. फरार असलेल्या निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत आहेत. त्याचबरोबर त्याच लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्स्पर्टचीही मदत घेतली जातेय, अशी माहिती समोर येत आहे.
निलेश चव्हाणला वैष्णवी हागणनेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांनी सह आरोपी केलं आहे. तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निलशे चव्हाण हा वैष्णवीची नणंद असलेल्या करिष्मा हगावनेचा मित्र आहे. त्याच्याविरोधात त्याच्या बायकोने 2022 ला छळवणुकीची तक्रार दिली होती. स्वतःच्या पत्नीचे स्पाय कॅमेऱ्याने आक्षेपार्ह्य व्हिडीओ शूट केल्याबद्दल पत्नीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यामुळे या फरार आरोपी निलेश चव्हाणला कोण वाचवतंय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल-
कस्पटे कुटुंबीयांच्या (वैष्णवीच्या माहेरचे) तक्रारीवरुन निलेश चव्हाण याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 मे रोजी वैश्नवीच्या माहेरचे लोक तीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वे नगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हीसकाऊन लावले होते . कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागीतल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता. वैश्नवीचे काका मनोज कस्पटे यांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीसांकडे बाळाला बेकायदेशीर डांबून ठेवल्याची तक्रार दीली. मात्र पोलीसांनी धमकावल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केलाय. निलेश चव्हाण हा वैनवीचा नवरा शशांक आणि वैश्नवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र आहे.
कोण आहे निलेश चव्हाण?
निलेशच्या चव्हाणच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर 14 जून 2022 ला गुन्हा दाखल झाला. त्याचा अटकपूर्व जमीनअर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर देखील वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यालयाने त्याला अटकपूर्व जमीन दिला. निलेश चव्हाणचा बांधकाम व्यवसाय आहे आणि पोकलेन मशीनचा देखील तो व्यवसाय करतो. निलेश चव्हाण हा शशांक हगवणेची बहिण करिश्मा हगवणेचा मित्र म्हणुन ओळखला जातो. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादामधे तो अनेकदा सहभागी असायचा. कर्वेनगर भागातील औदूंबर पार्क सोसायटीत निलेश चव्हाणच्या वडीलांच्या नावे तीन फ्लॅट आहेत.
सनकी निलेश चव्हाणचे कारनामे उघड-
3 जून 2018 ला निलेश चव्हाणच लग्न झालं. जानेवारी 2019 मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. तिने निलेशला याबद्दल विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. पुढच्या फेब्रुवारी महिन्यात निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळीही निलेशने उडवाउडवीची उत्तर दिली. एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा लॅपटॉप उघडून पहिला असता, त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं. बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. त्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह्य अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले.
























