एक्स्प्लोर

Crime News: पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?

Crime News: तब्बल ४५ दिवस ही महिला पती हरवल्याचे नाटक करत नातेवाईक आणि पोलिसांची दिशाभूल करत होती.

आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सिकंदरा परिसरातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका लग्न झालेल्या महिलेने अत्यंत क्रूरपणे स्वतःच्या पतीचा काटा काढला. इतकेच नव्हे तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिने मृतदेह घराच्या बाथरूमच्या जमिनीखाली गाडून त्यावर सिमेंटचा थर लावून फरशी घालून बथरूम तयार करून घेतलं. तब्बल ४५ दिवस ही महिला पती हरवल्याचे नाटक करत नातेवाईक आणि पोलिसांची दिशाभूल करत होती. मात्र, एका जुन्या प्रकरणाच्या पोलीस पडताळणी दरम्यान (Routine Verification) या भयानक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे.

UP crime news : मुलींना पाठवले बाहेर; खिरीत दिली गुंगीची औषधे

मिळालेल्या माहितीनुसार, मृत ४४ वर्षीय सुरेंद्र शर्मा हे आपली पत्नी रूबी शर्मा आणि दोन मुलींसह सिकंदरा येथील रेणुका धाम (दहतोरा) कॉलनीत राहत होते. १८ मे रोजी अचानक सुरेंद्र बेपत्ता झाले. या हत्येच्या दिवशी रूबीने अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता. तिने आधी दोन्ही मुलींना सुरेंद्र यांच्या मोठ्या भावाच्या घरी पाठवून दिले. त्यानंतर घरात कोणी नसताना तिने सुरेंद्र यांना रात्री खिरीमध्ये गुंगीच्या गोळ्या मिसळून दिल्या. सुरेंद्र बेशुद्ध पडल्यानंतर तिने त्यांचा गळा आवळून जीव घेतला.

UP crime news : बाथरूममध्ये खणला खड्डा; मिस्त्री बोलावून वरून टाकला सिमेंटचा फर्श

हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रूबीने बाथरूममध्ये एक मोठा खड्डा खणला. धक्कादायक बाब म्हणजे, तिने या कामासाठी आधीच मिस्त्री आणि मजूर बोलावून पूर्वतयारी केली होती. तिने सुरेंद्र यांचा मृतदेह त्या खड्ड्यात गाडला  आणि मिस्त्रीकडून वरून पुन्हा सिमेंट टाकून नव्या फरश्या बसवून बाथरूम तयार करून घेतलं, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. यानंतर नातेवाईक किंवा शेजाऱ्यांनी विचारल्यास, "ते कुठेतरी निघून गेले आहेत, लवकरच परत येतील" असे सांगत ती नाटक करत राहिली. २६ मे रोजी सिकंदरा पोलीस ठाण्यात सुरेंद्र यांची अधिकृत बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती.

UP crime news :पोलीस व्हॅरिफिकेशन आणि भावाच्या संशयाने सुटला गुंता

हे हत्याकांड तब्बल दीड महिना जगापासून लपून राहिले. मात्र, एका जुन्या प्रकरणात सुरेंद्र यांच्याशी संबंधित कागदपत्रांच्या नियमित पडताळणीसाठी (Verification) पोलिसांचे एक पथक अचानक त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांच्या चौकशी दरम्यान रूबी प्रचंड घाबरली आणि तिची वर्तणूक संशयास्पद वाटू लागली. तिने तातडीने आपल्या दिराला (सुरेंद्र यांचे भाऊ अनिल शर्मा) घरी बोलावून घेतले.

अनिल शर्मा यांना आधीपासूनच भाऊ अचानक गायब होण्यावर आणि रूबीच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवर संशय होता. त्यांनी बँकेचे रेकॉर्ड तपासले होते आणि ते स्वतःच्या पातळीवर शोध घेत होते. अनिल यांनी घरात आल्यावर रूबीला थेट विचारले, "सुरेंद्र कुठे आहेत?" त्यावर तिने आधी 'घरातच आहेत' असे सांगितले. पुन्हा 'कुठे?' असे विचारल्यावर तिने "बाथरूमच्या फर्शखाली" अशी कबुली दिली. अनिल यांनी तात्काळ ही माहिती तिथे हजर असलेल्या पोलिसांना दिली. पोलिसांनी रूबीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.

UP crime news : बाथरूमचा फरशी तोडला अन्...

रूबीने दाखवलेल्या जागेवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बाथरूमचा सिमेंटचा फर्श तोडला. खालील माती बाजूला केल्यावर पोलिसांना सुरेंद्र शर्मा यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. ज्या व्यक्तीचा शोध संपूर्ण कुटुंब ४५ दिवसांपासून घेत होते, तो घरातच दफन असल्याचे पाहून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवला आहे.

UP crime news :  शेजारी आणि पोलिसांसमोर अनेक प्रश्न

हरिपर्वात सर्कलच्या एसीपी अमिषा यांनी सांगितले की, २६ मे रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार आली होती, मात्र तपासात पत्नीनेच खून करून मृतदेह बाथरूमखाली लपवल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या पती-पत्नीमध्ये दारू पिण्यावरून आणि इतर कारणांमुळे नेहमी घरगुती भांडणे होत असत. आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, या हत्येच्या कटात रूबीसोबत इतर कोणी सामील होते का? तसेच ज्या मिस्त्री आणि मजुरांना बोलावले होते, त्यांना फक्त दुरुस्तीचे काम सांगण्यात आले होते की त्यांनाही या कटाची माहिती होती? पोलीस सध्या फॉरेन्सिक टीमच्या मदतीने, शवविच्छेदन अहवाल आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे या सर्व प्रश्नांचा सखोल तपास करत आहेत. आरोपी रूबी शर्मा सध्या पोलीस कोठडीत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Advertisement

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Embed widget