एक्स्प्लोर

Tukaram Mundhe Pune FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई

Tukaram Mundhe Pune FDA Raid: अन्न व औषध प्रशासनाने पुणे शहरातील हॉटेल्सवर मोठी कारवाई करत प्रसिद्ध 'मथुरा प्युअर व्हेज' हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Tukaram Mundhe Pune FDA Raid: पुण्यातील खवय्यांसाठी आणि हॉटेल चालकांसाठी एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) पुणे शहरातील हॉटेल्सवर मोठी कारवाई करत प्रसिद्ध 'मथुरा प्युअर व्हेज' (Mathura Pure Veg) हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अन्न पदार्थांच्या चाचणीचे अहवाल येईपर्यंत हे हॉटेल बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच पुण्यातील तब्बल 7 नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने एफडीएने निलंबित केले आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या कडक निर्देशानुसार ही धडक कारवाई करण्यात आल्याने हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

राज्यात नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात हॉटेल चालकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. 1 ते 3 जुलै दरम्यान संपूर्ण राज्यातील तब्बल 70 हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची (Hotels and Restaurants) अचानक तपासणी करण्यात आली.

Tukaram Mundhe Pune FDA Raid: अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळला

पुण्यातील ज्या 7 रेस्टॉरंट्सवर एफडीएने धाडी टाकल्या, तिथे अन्न सुरक्षा कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले. तपासणी दरम्यान हॉटेलच्या स्वयंपाकघरात कमालीची अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारत प्रशासनाने त्यांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.

Tukaram Mundhe Pune FDA Raid: 'मथुरा प्युअर व्हेज'वर मोठी कारवाई

पुण्यातील प्रसिद्ध 'मथुरा प्युअर व्हेज'वर झालेली कारवाई सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. एफडीएच्या पथकाने या हॉटेलमधील अन्नपदार्थांचे नमुने जप्त केले असून ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहेत. हा चाचणी अहवाल जोपर्यंत अधिकृतपणे येत नाही, तोपर्यंत हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

Tukaram Mundhe Pune FDA Raid: हॉटेल चालकांचे धाबे दणाणले

अन्न सुरक्षा मानकांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कोणत्याही हॉटेलची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आगामी काळातही पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही तपासणी मोहीम अशीच तीव्रतेने सुरू राहणार असल्याने हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik FDA Raid: तुकाराम मुंढेंची नाशिकमध्ये मोठी कारवाई; 2 दिवसांत 20 हॉटेल्सची तपासणी, 7 रेस्टॉरंट्सचे थेट परवाने निलंबित

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget