एक्स्प्लोर

Tukaram Mundhe Raid : तुकाराम मुंढेंच्या रडारवर आता मुंबईतील व्यापारी; 1,328 किलो भेसळयुक्त मिठाई, मावा जप्त

Mumbai FDA Raid: एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे गिरगाव आणि कुंभारवाड्यातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबई : अन्नातील भेसळीविरोधात (Food Adulteration) राज्यभर कारवाईचा तीव्र धडाका लावलेले अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची वक्रदृष्टी आता मुंबईतील भेसळखोर व्यापाऱ्यांवर पडली आहे. मुंबईत एफडीएच्या पथकाने एक मोठी कारवाई करत तब्बल 1,328 किलो संशयित भेसळयुक्त मिठाई आणि मावा जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे मुंबईतील अस्वच्छ आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

एफडीएच्या पथकाने मुंबईतील गिरगाव आणि कुंभारवाडा परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापेमारी (FDA Raid) करून ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या एकूण मालाची बाजारपेठेतील किंमत 3 लाख 60 हजार 380 रुपये एवढी आहे.

Tukaram Mundhe FDA Action Report : मोठ्या प्रमाणात साठा जप्त

एफडीए आयुक्तांच्या थेट मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत खालील व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली:

डी. एम. मावावाला (DM Mavawala) या ठिकाणाहून तब्बल 1,239 किलो संशयित मिठाई आणि मावा जप्त करण्यात आला आहे.

विजयकांत यादव (Vijaykant Yadav) या व्यापाऱ्याकडून 89 किलो संशयित माव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

छापेमारी दरम्यान या दोन्ही ठिकाणी मिठाई आणि माव्याची अत्यंत अस्वच्छ पद्धतीने साठवणूक केली असल्याचं उघड झालं. तसेच, पॅकिंगवरील लेबल नियमांचे सर्रास उल्लंघन आणि अन्नपदार्थ टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या तापमान नियंत्रणाचा (Temperature Control) पूर्णपणे अभाव आढळला.

Food Adulteration Lab Testing : आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक 

जप्त करण्यात आलेले अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचा संशय एफडीएने व्यक्त केला आहे. या कारवाईनंतर मिठाई आणि माव्याचे 5 अधिकृत नमुने (Samples) तातडीने पुढील रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत (Laboratory Testing) पाठवण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

FDA Appeal : दूधजन्य पदार्थांच्या साठवणुकीबाबत एफडीएचे आवाहन

मुंबई आणि परिसरातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, एफडीएने सर्व उत्पादक आणि व्यापाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. सर्व व्यापाऱ्यांनी दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक ही स्वच्छ जागी आणि योग्य तापमान नियंत्रित ठेवूनच करावी, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या नव्या कारवाईतून मिळाले आहेत.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget