Wardha : धक्कादायक! पोटच्या नवजात बाळाला पिशवीतून दिले फेकून; वर्ध्याच्या आष्टीतील घटना
Wardha News : वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात येत असलेल्या माणिकवाडा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात कुमारी मातेने नवजात बाळाला बेवारस फेकून दिल्याची घटना घडली आहे.
Wardha News वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात येत असलेल्या माणिकवाडा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात कुमारी मातेने नवजात बाळाला बेवारस फेकून दिल्याची घटना घडली आहे. माणिकवाडा येथे बेवारस अवस्थेत एक दिवसाचे नवजात बाळ आढळून आलेय. माणिकवाडा येथे दोन घराच्या बोळीत शेजाऱ्यांना नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. यात एका पिशवीत नुकतच जन्मलेले बाळ हे बेवारसपणे फेकून दिल्याचे आढळून आले होते. दरम्यान या घटनेची माहिती स्थानिकांनी आष्टी पोलिसांना दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सध्या पोलीस बाळाच्या मातेचा शोध घेत असून नवजात बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेय.
गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती
पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा ग्रामीण रुग्णालयातून ठाणे येथे रेफर केलेल्या गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याची घटना उजेडात आली आहे. वाडा तालुक्यातील अब्जे येथील कल्याणी कैलास भोये यांचे 108 च्या रुग्णवाहिकेत प्रसुती झाली आहे. ठाणे रुग्णालयात जात असताना शिरीष पाड्याजवळ या महिलेची प्रसूती झाल्याची कुटुंबियांनी दिली आहे. तर बाळ आणि मातेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वाडा येथे कोणतेही उपचार न करताच ठाणे रुग्णालयात रेफर केलं जात असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.
आरोग्य सेवेच्या अमलबजावणीत 10 जिल्ह्यांची परिस्थिती बिकट
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या निर्देशांकावर आधारित जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील ऑक्टोबर महिन्यातील रँकिंग राज्यस्तरावर तयार करण्यात आली. त्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या रँकिंगमध्ये चक्क केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा जिल्हाच पिछाडीवर असून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी चक्क आपल्या कामगिरीमध्ये शेवटच्या स्थानी झळकून आले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातर्गत रँकिंग जाहीर
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत मातृ स्वास्थ, मुलांचे आरोग्य, कुटुंब नियोजन, लसीकरण, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना, किशोरवयीन आरोग्य, आशा कार्यक्रम, प्रशासन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुपोषण अशा सेवा निर्देशांकाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या पथकामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आधीन असलेल्या संस्थांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी व पाहणी केली होती. यात बुलढाणा जिल्हा अतिशय शेवटच्या स्थानी आढळून आला आहे. ऑक्टोबर 2024 ची रँकिंग जाहीर झाली असून यात वाशिम जिल्हा सर्वप्रथम तर नाशिक जिल्हा द्वितीय तर ठाणे जिल्हा तृतीय स्थानावर आढळून आले आहेत.
हे ही वाचा