एक्स्प्लोर

Vasai : तब्बल 250 किमी पाठलाग करत तीन नेपाळी चोरांना अटक, वसई पोलिसांची धडाकेबाज कारवाई

वसईमध्ये डॉक्टराच्या घरात चोरी झाली होती आणि ही चोरी पोलिसांनी अवघ्या 48 तासात उजेडात आणली आहे. चोरी करणाऱ्या तीन नेपाळी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. 

ठाणे : एखाद्या बॉलीवूडच्या सिनेमाला ही लाजवेल अशी वास्तवात कामगिरी वसईच्या पोलिसांनी केली आहे. वसई पोलिसांनी तब्बल 250 किमीचा पाठलाग करत, चोरांना भारताची हद्द पार करण्याच्या आत अटक केली आणि चोरीचा बहुतेक माल रिकव्हर केला आहे. वसईमध्ये डॉक्टराच्या घरात चोरी झाली होती आणि ही चोरी पोलिसांनी अवघ्या 48 तासात उजेडात आणली आहे.

हे एखाद्या पिक्चरमधील कथानक असल्यासारखं वाटेलं. मात्र वसईच्या पोलिसांनी हा कारनामा करुन दाखवला आहे. जवळपास 250 किमीचा पाठलाग करत चोरांना भारताची बॉर्डर पार करण्याच्या आत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आणि त्यांच्याकडून बहुतेक चोरीचा माल ही हस्तगत केला आहे.

गेल्या महिन्याच्या 30 तारखेला बाभोला येथे राहणाऱ्या एका डॉक्टरच्या घरात चोरी झाली होती. घरातील सर्वजण 28 नोव्हेंबरला लग्नानिमित्त घराबाहेर गेले होते. याचाच फायदा घेत घरच्या नेपाळी सुरक्षा रक्षकाने आपल्या अन्य तीन नेपाळी साथिदारांसह धाडसी चोरी केली. घरातील सहा लॉक तोडून, सोनं, चांदी तसेच घरातील मौल्यवान सामान असा 15.20 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला होता.

घरातील सुरक्षा रक्षकच गायब असल्याने पोलिसांना सुरक्षा रक्षकावरच संशय आला. त्यांनी लगेच चार पथक तयार करुन, जलद गतीने तपासाची चक्रे फिरवली. डॉक्टरकडे असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या माहितीवरुन पनवेल येथे गेल्यावर त्यांनी यांचे नातेवाईक सुरत येथे राहात असल्याच सांगितलं. त्यानंतर पोलिसांचं एक पथक लगेच गुजरातच्या सुरतला गेले. त्यानंतर सुरत येथे हे तिघे ही गोध्रा बसमध्ये चढले असून, ते नेपाळला जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी भाड्याने गाडी घेवून, सुरत ते गोध्रा असं 250 किमीच अंतर कापत या तिघांनाही भारताची हद्द पार करण्याअगोदर  चोरीच्या मालासह अटक केली आहे.

सुरेंद्र अम्रीत बोगोटी, झपातसोप शरपजीत सोप, शेरबहाद्दूर फुलबहाद्दूर शाही असं या तिघांची नावे असून, तिघेही मुळचे नेपाळचे राहणारे असून, ते वॉचमॅनचं काम करतात. यातील सुरेंद्र बोगोटी हा डॉक्टरकडे सुरक्षा रक्षकाचं काम करायचा. याच्यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर याच्यांकडून 180 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 8 किलो वजनाचे चांदीचे दागिने, 10 घडयाळे, 1 लॅपटॉप, 1 आयपॅड आणि रोख रक्कम 1.23 लाख असा एकूण 13.93 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: नागपुरात दिवसाढवळ्या घरात घुसून दरोड्याचा प्रयत्न; नागरिकांच्या मारहाणीमुळे चोरट्याचा मृत्यू? शवविच्छेदन अहवाल समोर
नागपुरात दिवसाढवळ्या घरात घुसून दरोड्याचा प्रयत्न; नागरिकांच्या मारहाणीमुळे चोरट्याचा मृत्यू? शवविच्छेदन अहवाल समोर
Sanjay Shirsat : 75 कोटींचा बंगला, 5 कोटींच्या गाड्या कुठून आल्या?, पीएचा 35-40 लाखांचा रेट?; धाराशिवच्या संस्थाचालकाचा संजय शिरसाटांवर गंभीर आरोप, म्हणाले 'आम्हाला वीष घालून...'
75 कोटींचा बंगला, 5 कोटींच्या गाड्या कुठून आल्या?, पीएचा 35-40 लाखांचा रेट?; धाराशिवच्या संस्थाचालकाचा संजय शिरसाटांवर गंभीर आरोप, म्हणाले 'आम्हाला वीष घालून...'
Thane Crime Pradeep Purnekar death and Sanjay Raut: हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
Pooja Birari Pink Nauvari Saree Look: 'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
Thane Crime Pradeep Purnekar death and Sanjay Raut: हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Embed widget