Daulat Maharaj Satpute Death Jalna News: कीर्तनकार दौलत महाराज सातपुतेंचा संशयास्पद मृत्यू; जालन्यातली पाताळेश्वर मंदिराच्या मठाधिपतींच्या मृत्यूने खळबळ
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: कीर्तनकार देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ दौलत महाराज सातपुते यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Daulat Maharaj Satpute Death Jalna News जालना: जालना जिल्ह्यातील सावंगी अवघडराव येथील पुरातन पाताळेश्वर मंदिराचे मठाधिपती आणि कीर्तनकार देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ दौलत महाराज सातपुते (Daulat Maharaj Satpute) यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (Jalna News)
देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ दौलत महाराज सातपुते यांचा मृतदेह काल गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात आणि त्यांच्या भाविकांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत असून ही आत्महत्या की घातपात आहे असा प्रश्न भाविकांना पडला आहे. (Daulat Maharaj Satpute Death Marathi News)
दौलत महाराजांवर मठाजवळच काल अंत्यसंस्कार- (Daulat Maharaj Satpute Death News)
ह.भ.प. दौलत महाराज सातपुते हे मूळ नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातले असून मागील आठ ते दहा वर्षापासून भोकरदन तालुक्यातील अवघडराव सांगवी गावातल्या पाताळेश्वर मंदिराच्या मठामध्ये ते वास्तव्यास होते, पंचक्रोशी धार्मिक किर्तन आणि समाज प्रबोधनाचे ते काम करत होते. दरम्यान या घटनेनंतर त्यांच्या मठाजवळच त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.
कोण होते ह.भ.प. दौलत महाराज सातपुते? (Who was Daulat Maharaj Satpute?)
ह.भ.प. दौलत महाराज सातपुते (वय 41) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधक होते. ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील राहणारे होते. गेल्या 8 ते 10 वर्षांपासून दौलत महाराज सातपुते जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात राहत होते. दौलत महाराज सातपुते तिथे कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक प्रबोधन करत होते. 14 नोव्हेंबरच्या रात्री गावात कीर्तन करून परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी (15 नोव्हेंबर) सकाळी दौलत महाराज सातपुते मृत अवस्थेत आढळले. पारध पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा:





















