Thane Crime : विकृत शिक्षकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा
Thane Crime : ठाण्यातील अंबरनाथमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आलाय.
Thane Crime : गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका खाजगी शाळेतील शिक्षकाने शाळेतील तीन अल्पवीयन विध्यार्थांचे लैगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ (Ambernath) शहरातील पश्चिम भागात असलेल्या एका खाजगी शाळेत घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लैगिंक शोषणाचे मोबाइल कॅमेऱ्यात चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित मुलांचे वारंवार लैगिंक शोषण करत असल्याचेही समोर आले. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात नराधम शिक्षकावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला बेडया ठोकल्या आहेत. जेम्स जोसेफ शेराव असे अटक नराधम शिक्षकाचं नाव आहे.
अधिकची माहिती अशी की, अंबरनाथ पश्चिम भागातील वांद्रापाडा परिसरात केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत गरीब मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून एका सामाजिक संस्थेमार्फत ही शाळा सुरू आहे. या शाळेत नराधम जेम्स शिक्षक असून . या शाळेत या भागातील सर्वसामान्य गरीब अल्पवयीन विध्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यापासून नराधम शिक्षक शाळेतील 14 ते 7 वर्षीय अल्पवीयन विद्यार्थ्यांकडून शाळेतच वर्गामध्ये अंगावरील कपडे काढून मालिश तेल करू घेत त्यांचे लैगिक शोषण करीत होता.
पीडित मुलांकडून तेल मालिश करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण पोलीस तपासात समोर
नराधम शिक्षकाकडून वारंवार लैंगिक छळ होत असल्याने पीडित मुलांनी शाळेत जाणे बंद केलं होत.मुलं शाळेत का येत नाही म्हणून शाळा संचालकाने त्या मुलांच्या घरी जाऊन चौकशी असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे नराधम उघड्या अंगावर पीडित मुलांकडून तेल मालिश करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.
शिक्षकाला न्यायालयात हजर केले, 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, पीडित मुलांच्या पालकांनी 6 डिसेंबर रोजी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाणे गाठत मुलांवर घडलेला प्रसंग कथन करताच, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमांसह पोस्को कायदयानुसार गुन्हा दाखल करत नराधमाला काही तासातच अटक केली आहे. आज नराधम शिक्षकाला न्यायालयात हजर केले असता 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या