नराधम दत्ता गाडेच्या अडचणी वाढल्या, महिलेचा रस्ता अडवून अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी 3 मोठी कलम वाढवली
Swargate Rape Case : नराधम दत्ता गाडेच्या अडचणी वाढल्या, महिलेचा रस्ता अडवून अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी 3 मोठी कलम वाढवली

Swargate Rape Case ,Datta Gade, Pune : पुण्यातील स्वारगेट एस टी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आलीये. आरोपी दत्ता गाडे याच्या अडचणींमध्य मोठी वाढ झालीये. पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याच्यावर आणखी 3 कलमांची वाढ केलीये. पीडित महिलेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि जबरदस्तीने 2 वेळा अत्याचार करणे अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांची वाढ करण्यात आलीये. भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2), 115 (2) आणि 127(2) या कलमांची वाढ करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आरोपी आणि पीडित तरुणीचे घटनेच्यावेळी परिधान केलेले कपडे जप्त करून क्राइम लॅबकडे पाठवले आहेत. आज न्यायालयाने आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आलेली आहे
पुण्यातील स्वारगेट एस टी स्टँड मध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला आज पुणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गाडे याचे वकील सुमित पोटे यांनी याप्रकरणातील पीडित तरुणीला आरोपीने 7500 रुपये दिले अशी माहिती न्यायालयात दिलीच नव्हती अशी कबुली आज दिली.
या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीवेळी, पोटे यांनी मात्र माध्यमांशी बोलताना आरोपीने पीडित तरुणीला पैसे दिले होते अशी माहिती दिल्याने एकच खळबळ उडाली होती. आज सुनावणी नंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना 7500 रुपयांचा कुठला ही युक्तिवाद न्यायालयासमोर झाला नसल्याची कबुली दिली. कोर्टासमोर युक्तिवाद संपल्यावर आरोपी गाडे याने ही माहिती आम्हाला दिली होती आणि त्यावरूनच आम्ही माध्यमांशी बोललो अशी सारवासारव गाडे याचे वकील पोटे यांनी केली. एक वकील म्हणून असं बेजबाबदार वक्तव्य करणं संयुक्तिक आहे का असा प्रश्न माध्यमांनी त्यांना आज विचारला असता त्यांनी मात्र उत्तर देणे टाळून तिथून काढता पाय घेतला आणि या प्रकरणी सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन देऊ असं सांगितलं. यामुळे 7500 रुपयाचा विषय न्यायालयासमोर युक्तिवाद न करता माध्यमांना हाताशी धरून समाजात खोटी माहिती देणाऱ्या या वकिलांवर पोलिस कारवाई करणार का असा प्रश्न आता उभा राहिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























