Gondia Crime : 3 वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी खड्ड्यात पुरलेले मृतदेह बाहेर काढला, अन् पुढे...
Gondia Crime News : गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील हेटी येथे 3 वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झालाय. यावरून गोंदियाच्या गोरेगाव पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची घटना घडलीय.
Gondia Crime News : गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील हेटी येथे 3 वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झालाय. यावरून गोंदियाच्या गोरेगाव पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची घटना आज 28 डिसेंबरला घडली. मानसी ताराचंद चामलाटे (3) असे मृतक चिमुकलीचे नाव आहे. मानसी ताराचंद चामलाटे ही चिमुकली आई गुनिता ताराचंद चामलाटे सोबत नागपूरच्या खापरखेडा येथे वास्तव्यास होती. यातच 26 डिसेंबर ला सायंकाळच्या सुमारास मानसीचा मृत्यू झाला. मुलीचे मृतदेह घेऊन मानसीची आई गुनिता चामलाटे ही आपल्या स्वगावी पालेवाडा हेटी येथे आली. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकृती बरी नसल्याने मानसीचा मृत्यू झाला, असे तिने सांगितले. त्यांनतर 27 डिसेंबरला दुपारी गावातीलच स्मशानभूमीत मानसीचा दफनविधी कार्यक्रम पार पडला. मात्र मानसीच्या मृत्यू मागे काहीतरी गुढ असावे, असा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर मृतक मानसीची मोठी आई कलाबाई ताराचंद चामलाटे यांनी गोरेगाव पोलिसात 27 डिसेंबरला रात्रीच्या दरम्यान तक्रार दाखल केली.
पोलिसांनी खड्ड्यात पुरलेले मृतदेह बाहेर काढला, अन् पुढे...
या तक्रारीची दखल घेत आज गोरेगाव पोलिसांनी तहसीलदार गोरेगाव यांच्या समक्ष हेटी येथे पुरण्यात आलेले प्रेत बाहेर काढले. चिमुकलीचा मृतदेह शव विच्छेदनासाठी केटीएस रुग्णालय गोंदिया येथे पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सध्या तपास सुरू आहे. मृतक मानसीची आई गुनिता ताराचंद चामलाटे हिला गोरेगाव पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर शवविच्छेदनानंतरच मानसीच्या मृत्यूचे खरे कारण कळू शकेल.
बदलापुरात 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाचा अत्याचार
बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार (Badlapur Crime News) केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बियर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्राने पीडितेवर अत्याचार केला.
पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती 21 डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं आणि या तिघांनी मद्यपान केलं. मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
गुन्हा दाखल होताच 12 तासात आरोपीला बेड्या-
पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिली. पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी तिने 23 डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या 12 तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या.
हे ही वाचा
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ