(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक! भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर तब्बल अर्धा तास दगडफेक, थरकाप उडवणारा Video Viral
Bhusawal Nandurbar Passenger : भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर थांबवून रेल्वेवर समाजकंटकांनी तब्बल अर्धा तास दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.
Jalgaon News : जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर (Bhusawal Nandurbar Passenger) रेल्वेची साखळी खेचून सुमारे अर्धा तास रेल्वे थांबवून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अमळनेरजवळ (Amalner) ही प्रकार घडला आहे. या घटनेत सुदैवाने ट्रेनमधील (Train) कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १२ जुलै रोजी अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने हजारो भक्तांची रेल्वेमध्ये गर्दी होती. भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून 11 वाजता सुटली. या रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू बसले होते. भोरटेक रेल्वेस्टेशन पूर्वी काही यात्रेकरूंनी धार टेकडीजवळ साखळी ओढत रेल्वेला थांबवले.
रेल्वेवर तब्बल अर्धा तास दगडफेक
यानंतर हजारो यात्रेकरू त्याठिकाणी उतरले. यावेळी काही समाजकंटकांनी रेल्वेवर तब्बल अर्धा तास दगडफेक केली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे प्रवासी चांगलेच धास्तावल्याचे दिसून आले.
दगडफेकीची कारण अस्पष्ट
दरम्यान, व्हिडीओमध्ये अमळनेरजवळ शेकडो नागरिक जमले होते. ते पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक करताना दिसून येत आहेत. ट्रेन अत्यंत संथ गतीने गतीने पुढे जात आहे. यावेळी ट्रेनमधील प्रवासी भीतीपोटी आरडाओरड करीत आहेत. दररोज भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरमधून हजारो प्रवासी प्रवास करतात. सर्वसामान्यांच्या वाहतुकीचे साधन म्हणून भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरची ओळख आहे. त्यातच या पॅसेंजरवर दगडफेक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही दगडफेक नेमकी का झाली? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दगडफेकीनंतर काही वेळाने ही रेल्वे पुढील प्रवासाला रवाना झाली.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Accident : नाशकात पुन्हा भीषण अपघात, आयशर-कारची जोरदार धडक, चौघांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! तरुणीच्या ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर हल्ला, 3 जणांवर गुन्हा दाखल