एक्स्प्लोर

Badlapur IVF Racket : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरण, पोलिसांची मोठी छापेमारी, घरगुती IVF केंद्रातून 8 लाखांचा इंजेक्शन औषधसाठा जप्त

Badlapur Women Egg Selling Case : पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर या महिलेला अटक केली असून या प्रकरणाचे धागेदोरे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

ठाणे : राज्याला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये तीन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून बेकायदेशीररीत्या घरांमध्ये सुरू असलेल्या आयव्हीएफ केंद्रातील इंजेक्शन आणि औषध जप्त केले आहेत. पोलिसांनी सुमारे आठ लाख रुपयांचे इंजेक्शन आणि विविध औषधसाठा जप्त केला आहे. 

बदलापूर येथील स्त्री बीज विक्री प्रकरणाचे धागेदोर ठाणे जिल्ह्याच्या बाहेर पर्यंत पोचलेले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात ज्या तीन महिलांना अटक झालेली आहे केवळ त्यांच्यापर्यंतच हे प्रकरण थांबले नसून यात काही सोनोग्राफी सेंटर्स आणि IVF सेंटर्सचा देखील सहभाग आहे. या प्रकरणाची लिंक अनेक मोठ्या आयव्हीएफ सेंटर पर्यंत जात आहे. अनेक ठिकाणी पोलीस आणि आरोग्य विभागाने धाडी टाकण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Badlapur Women Egg Trafficking Racket : प्रकरण नेमकं काय? 

बदलापूरात स्त्री बीजाच्या अवैध विक्रीचं रॅकेट उघड झालं आहे. याप्रकारचं हे भीषण रॅकेट चक्क एका घरातून चालवलं जात होतं. सुलक्षणा गाडेकर या महिलेनं घरामध्ये स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवली होती, असा आरोप आहे. 

गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून हे इंजेक्शन दिलं जात होतं. त्यानंतर गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF सेंटरमध्ये पाठवलं जात होतं. तिथल्या डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकानं सुलक्षणा गाडेकर यांच्या घरी धाड टाकून हे रॅकेट उघडकीस आणलं. या प्रकरणी गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हे एक मोठं इंटरनॅशनल रॅकेट असण्याची शक्यता आहे. 

Badlapur IVF Scandal : महिलांना 15 ते 20 हजार रुपये

ज्या महिलांच्या गर्भात स्त्री बीज प्रक्रिया केली जात असे अशा महिलांना 15 ते 20 हजार रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. तर मध्यस्थी काम करणाऱ्या महिलांना तीन हजार रुपये दिले जात असल्याची माहिती आहे. स्त्री बीज हे तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्यांमध्ये पाठवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

या प्रकरणात आपल्या पत्नीला फसवण्यात येत असल्याचा आरोप सुलक्षणा गाडेकरचे पती संजय वर्मा यांनी केला. ते म्हणाले की, "माझी पत्नी केवळ मध्यस्थ म्हणून काम करत होती. ज्या महिलांशी संपर्क होत असे, त्यांना प्रक्रियेची माहिती देत असे आणि त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच त्यांच्या पतीची परवानगी आणि स्वाक्षरीसह आधार आणि पॅन कार्डची कागदपत्रे घेतल्यानंतरच संबंधित महिलेला डॉक्टरांकडे भेटीसाठी पाठवत असे. या कामासाठी तिला तीन हजार रुपये मानधन मिळत असे. ज्या महिलांच्या गर्भात  स्त्री बीज प्रक्रिया केली जात  असे, तिला 15 ते 20 हजार रुपये दिले जात असे. डोनर महिलांना डॉक्टरांकडे सुमारे पंधरा दिवस इंजेक्शन दिले जात होते. त्यानंतर तयार झालेले बीज वैद्यकीय प्रक्रियेद्वारे काढण्यात येत होते."

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget