एक्स्प्लोर

Solapur Crime: धक्कादायक! शेताच्या बांधावर झाडं काढण्यावरून वाद, संतापाच्या भरात एकाला संपवलं, करमाळा हादरला

या हत्येप्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे अर्जुननगर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Solapur Crime News: राज्यात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हत्या, खूनांच्या घटना वाढत असताना सोलापूरच्या करमाळ्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. शेतात झाडं काढण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी एका शेतकऱ्याचा खून केल्याची घटना समोर आलीय. या घटनेनंतर दोन सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटकही केलीय. शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात अशा प्रकारे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना करमाळा तालुक्यातील अर्जुननगर येथे घडली आहे. या प्रकरणात दोन सख्ख्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

झाडे काढण्यावरून वाद, थेट हाणामारीपर्यंत

प्राथमिक माहितीनुसार, अर्जुननगर येथे शेताच्या बांधावर असलेल्या झाडे काढण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. याच वादातून दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून आला आणि त्याचे रूप हाणामारीत बदलले. या मारहाणीत भुजंग सावळा रोकडे यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तात्याबा बाबुराव रोकडे आणि नागनाथ बाबुराव रोकडे या दोघांविरोधात करमाळा पोलिसात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 103(1), 115(2), 3(5), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे. या हत्येप्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे अर्जुननगर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

रांजणगावमधील हत्याकांडाचं गुढ उलगडलं

पुण्यातील रांजणगावमध्ये 10 दिवसांपूर्वी आढळून आलेल्या तीन मृतदेहांचे गुढ उकलण्यात पोलिसांनी (Police) यश आलं आहे. एका 25 वर्षीय महिलेसह तिच्या लहान दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, संबंधित महिला या परिसरातील कोणाच्याही परिचयाची नव्हती. त्यामुळे, पोलिसांना या घटनेचा तपास करण्यासाठी अधिक वेळ लागला. अखेर, 10 दिवसांनी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून अनैतिक संबंधातूनच हे तिहेरी हत्याकांड घडल्याचं तपासातून समोर आलं आहे. संबंधित महिला बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगावची असल्याचे तपासातून निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्वतः गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष 6 तपास पथकांची नेमणूक केली होती. राज्यभरातील 33 पोलिस ठाण्यांतील अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, आशा वर्कर्स, आरोग्य सेविका यांच्या मदतीने सुमारे 16,500 भाडेकरूंना विचारपूस करुन आणि 250 सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करुन पोलिसांनी हत्याकांडाचा तपास उलगडला. 

Ashok Dhodi Case : पाच महिन्यांपासून गुंगारा, अखेर शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांना गवसला, दादरा नगर हवेलीतून ठोकल्या बेड्या

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget