एक्स्प्लोर

प्रेमसंबंधामुळे गावात बदनामी होण्याच्या भीतीने बापाने 17 वर्षीय मुलीला संपवलं, नंतर आत्महत्येचा बनाव रचला, जालन्यात थरारक घटना

Jalna Crime: चौकशीत अखेर आरोपी पिता हरी जोगदंड याने मुलीच्या खुनाची कबुली दिली. त्याला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

Jalna Crime: जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दावलवाडी गावात थरारक घटना उघडकीस आली आहे. गावातील एका पित्याने स्वतःच्या 17 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चेमुळे कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीपोटी पित्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

नेमकं घडलं काय? 

जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातल्या दावलवाडी गावामध्ये मुलीच्या प्रेमसंबंधामुळे बदनामी होईल म्हणून पित्यानेच आपल्या 17 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आलीय, याप्रकरणी आरोपीने मुलीची हत्या करून तिने घरातच गळफास घेतल्याचा बनाव देखील केला होता, शुक्रवारी घडलेल्या या घटनेचा तपास पोलीस करत असताना पोलिसांना याचा संशय असल्याने पोलिसांनी आरोपी पिता हरी जोगदंड याला काल अटक केल. आरोपींनी या प्रकरणाची कबुली दिली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीय ,या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आत्महत्येचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल

ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. मुलीचा गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी पित्याने मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांना या मृत्यूबाबत संशय आला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आरोपीवर बारकाईने नजर ठेवली. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. चौकशीत अखेर आरोपी पिता हरी जोगदंड याने मुलीच्या खुनाची कबुली दिली. त्याला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गावात संतापाचे वातावरण 

या घटनेमुळे दावलवाडी गावात एकच खळबळ उडाली आहे. स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून करणाऱ्या पित्याच्या कृत्याबद्दल गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्रेमसंबंध हा गुन्हा नसतानाही मुलीचा जीव घेणे ही अमानुष कृती असल्याचे गावकरी सांगत आहेत. या खुनामागची संपूर्ण कारणमीमांसा आणि नेमक्या कोणत्या परिस्थितीत आरोपीने असे टोकाचे पाऊल उचलले, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. याप्रकरणी पुढील काही उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणार नाही..., लग्नाचा तगादा अन् घरात शिरून धमकी; 19 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन, पोलिसांची अवघ्या 10 तासांच्या आत कारवाई
माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणार नाही..., लग्नाचा तगादा अन् घरात शिरून धमकी; 19 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन, पोलिसांची अवघ्या 10 तासांच्या आत कारवाई
High Court Nagpur DJ Ban: मोठी बातमी : नांगरे-पाटलांच्या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी करा, हायकोर्टाचा निर्णय, एकट्या नागपूरमध्ये नव्हे संपूर्ण विदर्भात DJ वर निर्बंध
मोठी बातमी : नांगरे-पाटलांच्या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी करा, हायकोर्टाचा निर्णय, एकट्या नागपूरमध्ये नव्हे संपूर्ण विदर्भात DJ वर निर्बंध
Bhandara Accident News: भंडाऱ्यात भीषण अपघातात वर्मा कुटुंबातील चौघांचा तर, उईके कुटुंबातील आईसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, पाच चिमुकले आईच्या प्रेमाला मुकले
भंडाऱ्यात भीषण अपघातात वर्मा कुटुंबातील चौघांचा तर, उईके कुटुंबातील आईसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, पाच चिमुकले आईच्या प्रेमाला मुकले
Delhi Red Fort Blast: YouTube, ChatGPT पासून ते एआय अन् विशेष बुटांपर्यंत...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात NIAच्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड
YouTube, ChatGPT पासून ते एआय अन् विशेष बुटांपर्यंत...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात NIAच्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on Manoj Jarange : जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
Manoj Jarange: पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही,जिथं अडवाल तथं...: मनोज जरांगे
पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही : मनोज जरांगे
BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, पंतप्रधान जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर
सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, पंतप्रधान जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर
EPF Advance New Rules: पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
Bachchu Kadu : निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंची मुंबईला जाण्याची घोषणा, कोणत्या मार्गाने आणि किती तारखेला जाणार, वाचा ए टू झेड माहिती
मनोज जरांगेंची मुंबईला जाण्याची घोषणा, कोणत्या मार्गाने आणि किती तारखेला जाणार, वाचा ए टू झेड माहिती
Crime News : हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा, गणेशोत्सवात मुंबईला आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे
मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा, गणेशोत्सवात मुंबईला आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे
Embed widget