Solapur Crime News: कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे...; स्टोरी ठेवत 18 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं; सोलापूर हळहळलं!
Solapur Crime News: सोलापूर शहरातील सुशील नगर विजापूर रोड येथील 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Solapur Crime News: सोलापूर शहरातील सुशील नगर विजापूर रोड येथील 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (Solapur Crime News) समोर आली आहे. योगेश अशोक ख्यागे (Yogesh Khyage) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
गळफास घेतलेल्या योगेशला नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवले आणि तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी योगेश ख्यागे याला मयत घोषित केले. आत्महत्येपूर्वी योगेशने इंस्टाग्रामवर एक स्टोरी अपलोड केली होती.
जीवन संपवण्याआधी योगेशने स्टोरी ठेवत काय म्हटलं? (Solapur Crime News)
“मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला, जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे..!!” अशी स्टोरी योगेशने इन्स्टग्रामवर शेअर केली होती. 
कोण आहे योगेश ख्यागे? (Solapur Yogesh Khyage)
योगेश एका बेकरी दुकानात काम करत होता, तर त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात. घटनेच्या वेळी योगेशचे आई-वडील नातेवाईकांकडे गेले होते, तर तो घरात एकटाच होता. योगेशने टोकाचे पाऊल का उचलले नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
धुळ्यातही धक्कादायक घटना- (Dhule Crime News)
धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात दुपारी दीड ते दोनच्या सुमारास गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय 27 वर्षे) यांनी आपल्या मुलगा दुर्गेश (वय 6 वर्षे) आणि मुलगी दुर्वा (वय 3 वर्षे) यांच्यासह गाव शिवारातील गोशाळेकडील विहिरीत उडी घेतली. कौटुंबिक वादांमुळे नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक प्राप्त होत आहे. विहिरीत 30 ते 40 फूट खोल पाणी असल्याने घटनेची लगेच कोणालाही कल्पना आली नाही. तिघांचा शोध सुरू झाल्यावर जवळपास संशय निर्माण झाला आणि अखेर विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाल्यावर तपासाची दिशा स्पष्ट झाली. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सोनगीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
























