एक्स्प्लोर

Sandeep Thapar Attack: धक्कादायक! पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, दोन आरोपी अटकेत

Shiv Sena Leader Sandeep Thapar: शिवसेना नेते संदीप थापर यांच्यावर पंजाबमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

Sandeep Thapar Attack: पंजाबच्या (Punjab News) लुधियानामध्ये (Ludhiana) शिवसेना (Shiv Sena) नेते संदीप थापर (Sandeep Thapar) गोरा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निहंगांच्या वेशात आलेल्या 3 ते 4 हल्लेखोरांकडून धार-धार शस्त्रांनी वार करत संदीप थापर यांच्यावर हल्ला करण्यात आला. जीवघेण्या हल्ल्यामध्ये संदीप गोरा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संदीप थापर यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 
 
शिवसेना नेते संदीप थापर यांच्यावर शुक्रवारी भरदिवसा तलवारीनं हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पंजाबमधील लुधियाना येथील फतेहगढ साहिब येथून पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी पंजाबमधील लुधियानामध्ये शिवसेना नेते संदीप थापर यांच्यावर चार हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात शिवसेना नेते संदीप थापर गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, संवेदना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंदर अरोरा यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलजवळील ट्रस्टच्या कार्यालयातून बाहेर आले असता संदीप थापर (58) यांच्यावर हल्ला करण्यात आला. 

हल्ल्याचं सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल

पंजाबच्या लुधियानामध्ये शिवसेनेचे नेते आणि शहीद सुखदेव सिंग यांचे नातेवाईक संदीप थापर गोरा यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला आहे. यामध्ये संदीप थापर गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.निहंगांच्या वेशात आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी संदीप थापर यांच्यावर धारधार शस्त्रांनी वार केले. सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरच त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. संवेदना ट्रस्टचे प्रमुख रविंदक अरोरा यांच्या पुण्यातिथी सोहळ्याचे आयोजन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते. थापर यांच्यासोबत बंदुकधारी गार्डही होते. या सोहळ्यात अरोरा यांना अभिवादन करून बाहेर येत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. 40 ते 50 लोकांसमोर हल्ला करून आरोपी संदीप यांच्या दुचाकीवर पळून गेले. संदीप यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात संदीप त्यांच्या बंदूकधारी रक्षकासोबत हॉस्पिटलबाहेर ट्रॅफिकमध्ये थांबलेले दिसत आहेत. दरम्यान, तीन निहंग सिंग आले आणि दोघांनी संदीपला पकडले तर एक जण त्यांच्या बंदूकधारीसाेबत निघून गेला. पोलिसांनी तिघा हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आपचं सरकार आल्यापासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली : अनिल सरीन

भाजपच्या पंजाब युनिटचे सरचिटणीस अनिल सरीन म्हणाले की, "मान हे केवळ राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, तर त्यांच्याकडे गृहखातेही आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) सरकार आल्यापासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालली आहे."

"हत्या, लुटमारीच्या घटनांमध्ये आणि गुंडांगिरीमध्ये वाढ झाली आहे. परिणामी लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पंजाब सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अशा घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.", असंही अनिल सरीन म्हणाले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणाDevendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीसCM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्नSanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Embed widget