(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अवघ्या 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दखल, परभणीच्या शाळेतली धक्कादायक घटना
परभणीच्या सोनपेठ शहरामधून अशीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.
Parbhani Crime News परभणी : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे चिमुकल्यावरील लैगिक अत्याचारांच्या (Sexual assault) घटनेने राज्यसह देश हादरला असताना परभणीच्या सोनपेठ शहरामधून अशीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार (Crime News) झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.
हे प्रकरण उजेडात येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आता या प्रकरणामध्ये अज्ञात इसमावर पॉस्को आणि इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी 8 पथकांची नियुक्ती केली आहे. शिवाय स्वतः पोलीस अधीक्षक या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे 8 पथक रवाना
मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. ज्यामध्ये मुलगी एका इंग्लिश स्कूलमध्ये बालवाडीमध्ये शिकत आहे. दरम्यान, 5 ऑक्टोबरला सायंकाळी शाळेतुन मुलगी घरी आल्यानंतर मुलीला सरळ बसता येत नव्हते. त्यानंतर आईने याबत चौकशी केल्यावर मुलीच्या अंगावर ओरखडल्याचे वृन दिसून आले. त्या अनुषंगाने मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर या सर्व प्रकरणात सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इसमावर पॉस्को आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे फिरवली असुन शाळेतील सर्व सीसीटीव्ही चेक करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र या प्रकरणामुळे परिसरातून एकच संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या