एक्स्प्लोर

Police Officer Serial Rapist : 18 वर्षांच्या सर्विसमध्ये 24 बलात्कार अन्... पोलीसच निघाला सीरियल रेपिस्ट

London Rapist Police Officer: एमईटी पोलीस अधिकाऱ्याबाबतच्या धक्कादायक खुलाशांमुळे संपूर्ण पोलिस विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही या प्रकरणी खंत व्यक्त केली आहे.

London Rapist Police Officer: लंडन मेट्रोपॉलिटन पोलीस (MET) च्या एका कार्यरत अधिकाऱ्याने 24 बलात्कारांसह 49 लैंगिक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ही बातमी केवळ लंडनमध्येच (London News) नाही, तर संपूर्ण जगभरात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरली. स्काय न्यूज ब्रॉडकास्टरनुसार, 48 वर्षीय अधिकारी डेव्हिड कॅरिकने पोलीस दलातील आपल्या 18 वर्षांच्या सेवेदरम्यान तब्बल 24 अत्याचार केले आहेत. 

2000 ते 2021 दरम्यान घडलेल्या या घटनांबद्दल लंडनमधील पोलिसांनी माफी मागितली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कॅरिकच्या मैत्रिणीनेही त्याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. डेव्हिड कॅरिक 2001 मध्ये मेट्रोपॉलिटन पोलीस दलात रुजू झाला होता. त्याने सुरुवातीला मेर्टन आणि बारनेट येथे रिस्पॉन्स अधिकारी म्हणून काम केलं. 2009 मध्ये त्याची संसदीय आणि राजकीय सुरक्षा कमांडोमध्ये बदली करण्यात आली. बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक आणि निलंबन होईपर्यंत कॅरिक याच विभागात कार्यरत होता. 

पोलिसांचं अपयश

डेव्हिडनं केलेली दुष्कृत्य आणि त्याचे गुन्हे समोर आल्यानंतर त्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं. त्याच्या बडतर्फीनंतर आता युनायटेड किंगडममध्ये पोलिसांच्याच चौकशीची मागणी केली जात आहे. पोलिसांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अनेक महिला अधिकाऱ्यांनी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हे मेट पोलिसांचं अपयश असल्याची टीका केली आहे. ब्रिटनच्या 'एंड व्हायलन्स अगेन्स्ट वुमन' संस्थेने या प्रकरणासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधूनही त्यांनी पोलीस दलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मेट पोलिसांना कॅरिकच्या घृणास्पद वागणुकीबद्दल माहिती होती आणि तरीसुद्धा ते त्याच्यावर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचंही या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.  

पंतप्रधानांकडून खंत व्यक्त 

या प्रकरणाबाबत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी खंत व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "कॅरिकसारखी व्यक्ती कधीही पोलीस अधिकारी होऊ नये. सुनक यांनी बोलताना हे देखील मान्य केलंय की, कॅरिकचे गुन्हे उघडकीस आल्यानंतर पोलिसांवरील विश्वास कमी झाला आहे. परंतु, लोकांच्या मनातील हा समज बदलासाठी प्रयत्न केला जात आहे. मेट्रोपॉलिटन पोलीस कमिशनर मार्क रॉली यांनी सर्वांची माफी मागितली आहे. एवढंच नाही तर पोलिसांनी सांगितलं की, आता जवळपास 1,000 लैंगिक गुन्हे आणि घरगुती शोषणाच्या दाव्यांचा तपास केला जात आहे, ज्यामध्ये सुमारे 800 अधिकारी सामील आहेत."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Kamble on Walmik Karad : वाल्मिक कराडचे इन्काउंटर करा, अशोक कांबळेंची खळबळजनक मागणीWalmik Karad Car Pune : 'या' कारमधून वाल्मिक कराड पुणे CID कार्यालयात शरणABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
Embed widget