एक्स्प्लोर

Satara Doctor Crime News: हातावर सगळं लिहिलं अन् महिला डॉक्टरनं जीवन संपवलं; पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोप, गोपाल बदने फरार, महिला आयोगाने दिली मोठी माहिती

Satara Doctor Crime News: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे.

Satara Doctor Crime News: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरने आत्महत्या केलीय. मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला (Satara Crime News) धक्कादायक वळण लागलंय. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलंय. त्यात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहीलंय. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तसंच आरोपी प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या अशी माहिती समोर येतेय. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी वादानंतर त्यांची चौकशी सुरू होती असं समजतंय. मात्र डॉक्टरच्या मृतदेहाच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळलीय. त्यात त्यांनी पोलिसानेच बलात्कार झाल्याचं नमूद करत आत्महत्या केल्याचं म्हटलंय.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devedra Fadnavis)  यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली आहे. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. यानंतर पोलिसांकडून गोपाळ बदनेचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे. एका आरोपीचे नाव पीएसआय गोपाल बदने आहे. तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे. दुसरा आरोपी प्रशांत बनकर आहे. तो पोलीस नसून तो सामान्य नागरिक आहे. या प्रकरणात आम्ही गोपाल बदने याला निलंबित करत आहोत, अशी माहिती तुषार दोषी यांनी दिली.

महिला आयोगाने दिली महत्वाची माहिती- (Mahila Ayog On Satara Women Doctor Death Case)

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे. तसेच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. सद्यस्थितीत याप्रकरणी फलटण सिटी पोलीसमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2) (N), 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोधपथक रवाना करण्यात आले आहे. मयत डॉक्टर यांचे शव विच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. फरार आरोपींचा तातडीने शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाने पोलीस अधीक्षक, सातारा यांना दिले आहेत. पीडित महिलेने याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत.

दोन्ही आरोपी फरार; रुपाली चाकणकरांची माहिती (Rupali Chakankar On Satara Doctor Case)

याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या की, घडलेली घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची मी माहिती घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल केलेले आहेत. यामधील आरोपी पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. हे दोघेही फरार आहेत. त्यांच्या तपासासाठी दोन पथक तयार करण्यात आलेले आहेत. पोलिसांचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तर या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी समोर येतील आणि तपास करणे सोयीचे ठरेल. परंतु घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. रक्षकानेच असे कृत्य करावे हे अत्यंत दुर्दैवी आहे. यामधील आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे देखील रुपाली चाकणकर यांनी म्हटले.

संबंधित बातमी:

Satara Doctor Crime News: हातावर पेनानं लिहिलं, महिला डॉक्टरने जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप, साताऱ्यातील फलटणमध्ये नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Financial Fraud: मुलींना बरं करण्याचं आमिष, 14 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी 'तांत्रिक' जोडपे अटकेत
Vote Scam : ‘मतचोर सरकारची ही जमीन चोरी’, राहुल गांधींचा थेट मोदींवर निशाणा
Pune Land Deal: 'अजित पवारांनी जमीन खाल्ली, मुख्यमंत्री पांघरूण घालतायत'; उद्धव ठाकरेंचा थेट आरोप
Narhari Zirwal On Parth Pawar : मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडून पार्थ पवार यांचं समर्थन
Parth Pawar Pune Land Scam: पुणे कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी 8 आरोपींविरोधात गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा खोचक टोला
अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा खोचक टोला
Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
Embed widget