हृदयद्रावक! साताऱ्यात 10 महिन्याच्या चिमुकल्याला विहिरीत फेकलं, कौटुंबिक वादातून काकाचं कृत्य, बाळाचा मृत्यू
Satara Crime News : दोन भावांचं भांडण, शिक्षा मात्र 10 वर्षांच्या चिमुकल्याला, कौटुंबिक वादातून विहिरीत फेकलं, बाळाचा मृत्यू
Satara Crime News : साताऱ्यात (Satara) मन सुन्न करणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. साताऱ्यातील कोडोली येथील दोन भावांच्या वादात दहा महिन्यांच्या चिमुकल्यानं जीव गमावला आहे. भावासोबत झालेल्या कौटुंबिक वादातून काकानं आपल्या पुतण्याला विहिरीत फेकून दिलं. या धक्कादायक घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनेती माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपी असलेला बाळाचा काका अद्याप फरार आहे.
दहा वर्षांच्या बाळाला विहरीत फेकून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी साताऱ्यात घडली आणि या बाळाचा खून करणारा चक्क त्याचाच काका असल्याचं समोर आलं आहे. ही हृदयद्रावक घटना घडली आहे. साताऱ्यातील कोडोली येथे मयुर मारुती सोनवणे आणि त्यांचा लहान भाऊ अक्षय असे एकत्रित राहतात. दोघांचंही लग्न झालेलं आहे. मयुरला शालमोल असं दहा महिन्याचं बाळ होतं. तर अक्षयचं नुकतंच लग्न झालं, मात्र त्याची पत्नी सध्या त्याच्यासोबत रहात नाही.
आई वडिल हे मयुरवर जास्त लक्ष देतात, त्याचीच जास्त विचारपूस करतात, असा अक्षयचा आरोप होता. त्यातून घरात अनेकवेळा वादावादीही झाली होती. याच रागातून अक्षय कायमच संतप्त असायचा. त्यानं हा राग मुयरच्या मुलावर म्हणजेच, स्वतःचा पुतण्या शालमोलवर काढण्याचं ठरवलं. त्यानं आज सकाळी त्याला चॉकलेट घेऊया चल, असं म्हणून सकाळी 8 वाजता घरातून बाहेर आणलं. घरापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर असलेल्या विहिरीजवळ नेलं आणि त्यानं त्या चिमुकल्याला दहा महिन्यांच्या बाळाला निर्दयीपणे विहिरीत टाकून दिलं.
विहीरितील पाण्यात बाळ बुडाल्याचं अक्षयच्या लक्षात आल्यानंतर तो तिथून निघून गेला. बाळाची आई शालमोलला शोधत होती, मात्र अक्षय आणि तिचं बाळ तिला कुठेच दिसले नाहीत. काही वेळानंतर कुटुंबातील सर्वजण त्या बाळाचा शोध घेत होते. दरम्यान, सातारा शहर पोलीस ठाण्यात एक फोन आला की, एक लहान बाळ विहिरीच्या पाण्यावर तरंगत आहे. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी तातडीनं पोहचले. त्यावेळी मयुरला कोणीतरी सांगितलं की, विहिरीत एक बाळ तरंगत आहे. मयुरनं तातडीनं विहिरीजवळ धाव घेतली, तेव्हा त्याला ते त्याचंच बाळ असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर त्यानं ही बाब स्वत: च घरात जाऊन आपल्या पत्नीला सांगितली. तेव्हा या कुटुंबाचा आक्रोश हा परिसर हेलावून सोडणारा होता. हे कृत्य मयुरचाच भाऊ अक्षयनं केल्याचं समोर आल्यानंतर अक्षयचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मयुरचे घरात जास्त लाड करतात, माझे लाड करत नाहीत, असं म्हणणं पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी अक्षयचं होतं. त्यातूनच त्यानं स्वत: च्याच पुतण्याला विहिरीत टाकल्याचं अक्षयनं पोलिसांना सांगितलं आहे. या कारणापलीकडे आणखी काही कारण आहे का? याचा शोध घेत असल्याचं सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितलं.