मोठी बातमी! भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या, कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून
सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथे भाजपाचे नेते सुधारक खाडे यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
सांगली : राज्यात सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. प्रत्यक्ष मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे. राजकीय नेते दिवसरात्र लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाच आता सांगली (Sangli) जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मनसेचे माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खाडेंची (Sudhar Khade Murder) हत्या झाली आहे. या घटनेनंतर आता सांगलीत आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या खाडे भाजपच्या (BJP) उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते.
मालमत्तेच्या कारणातून हत्या झाल्याची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार मिरज-पंढरपूर रस्त्यावर ही घटना घडली होती. प्राथमिक माहितीनुसार मालमत्तेच्या कारणातून ही हत्या झाली आहे. सध्या सुधाकर खाडे हे भाजपच्या स्टार्टअप इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. 2014 मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती
मीरज-पंढरपूर रस्त्यावर सुधाकर खाडे यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. खाडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात केली होती. खाडे यांनी 2014 साली तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात
या प्रकरणाशी निगडित पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर रोड येथील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. याच वादातून संशयित व्यक्तीने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यातच खाडे यांचा मृत्यू झाला. कुऱ्हाडीने वार केल्यानंतर खाडेयांना जखमी अवस्थेत मिरजेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे घोषित केले. सदर घटनेबाबत घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :
घरकाम करणाऱ्या महिलेकडे आढळले लाखोंचे घबाड; जळगाव, जालन्यातही पोलिसांची मोठी कारवाई