एक्स्प्लोर

Sangli News : अल्पवयीन विद्यार्थीनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांकडून बेदम चोप; शिक्षकाला तत्काळ निलंबित करण्याची मागणी

Sangli News : सांगली शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत शाळेतील एका शिक्षकाने अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे.

Sangli Crime News :  सांगलीतील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये अल्पवयीन विद्यार्थीनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला पीडित पालकांनी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला आहे. सांगली शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत शाळेतील एका  शिक्षकाने अश्लील चाळे केले होते.  विद्यार्थीनीने घाबरून तिच्या सोबत घडलेला हा प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितला. त्या वेळी अन्य विद्यार्थीनींसोबत देखील अशाच प्रकारे गैरवर्तन केल्याचे विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले. 

या प्रकरणी पीडित पालकांनी मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावर सर्व पालकांना घेऊन ते संबंधित शिक्षण संस्थेमध्ये पोहचले. अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत झालेल्या प्रकारचा जाब विचारला त्यावेळी पीडित पालकांचा व मनसे कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला त्यांनी त्या विकृत शिक्षकाला चांगलाच चोप दिला. झालेला प्रकार हा अतिशय निंदनिय आहे. पालक आणि विद्यार्थी भीतीच्या वातावरणात आहेत. अशा विकृतीमुळे शाळेत मुली पाठवायला देखील पालक घाबरत आहेत. जोपर्यंत हा विकृत शिक्षक निलंबित होत नाही तोवर आमच्या मुलींना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला होता. या वेळी त्या विकृत शिक्षकाला तत्काळ निलंबित करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी संस्था चालकांकडे केली आहे. 

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी देखील त्या विकृत शिक्षकास नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मनसे महिला आघाडीच्या सरोजा लोहगावे, जमीर सनदी, दयानंद मलपे, विठ्ठल शिंगाडे, अमित पाटील, संजय खोत, प्रकाश माळी, अमर औरादे, अनिकेत कुंभार, रोहित जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

संभाजीनगर हादरलं! कॉफी कॅफेमध्येच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अभ्यासिकेत ओळख झालेल्या मित्राकडूनच कॉफी कॅफेमध्ये (Coffee Cafe) नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape) करण्यात आल्याच्या घटनेने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहर हादरले आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कॉफी कॅफेमध्ये अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून, सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. नितीन वाघ असे आरोपीचे नाव आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सAkshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Akshay Shinde Encounter: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
Embed widget