Sangali Crime : सांगलीतील 'पुष्पा'; रक्तचंदनाच्या तस्करीचा भंडाफोड, 2 कोटींहून अधिक रकमेचे ओंडके जप्त
Sangali Crime News : सांगलीतील 'पुष्पा', रक्तचंदनाच्या तस्करीचा भंडाफोड झाला असून तब्बल 2 कोटी 85 लाख 45 हजारांचं रक्तचंदन जप्त करण्यात आलं आहे.
Sangali Crime News : सध्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या 'पुष्पा'ची छाप अनेकांवर उमटली. पुष्पाची स्टाईल, पुष्पाचं बोलणं, त्याचे डायलॉग्स याची सर्वांनाच भूरळ पडली होती. असाच एक पुष्पा सांगलीत सापडला आहे. पुष्पा चित्रपट चर्चेत आल्यानंतर रक्तचंदनाच्या तस्करीची सांगलीत भांडाफोड झाली आहे. दोन कोटी 45 लाख 85 हजारांचे एक टन रक्तचंदनाचे ओंडके जप्त करण्यात आले. मिरजमधील महात्मा गांधी चौक पोलीस आणि सांगली पोलिसांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आहे.
रक्तचंदनाच्या तस्करीवर आधारित असलेला पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. पण सांगली पोलीस आणि वन विभागानं खरीखुरी रक्तचंदनाची तस्करी उघडकीस आणली आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात दाखल झालेल्या 1 टन वजनाच्या आणि सुमारे दोन कोटी 45 लाख 85 हजारांचे रक्तचंदन मिरजेत पोलीस आणि वन विभागानं धाड टाकून पकडलं आहे. यावेळी यासिन इनायतउल्ला खान याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची टीपद्वारे माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक अशोक विरकर आणि सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकानं वन विभागाच्या साहाय्यानं चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रविवारी पहाटे तस्करी होत असलेलं रक्तचंदन मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली. फडणीस यांनी मिरज-कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला.
द्राक्ष वाहतूकीस चाललोय, असं सांगून जात असलेला KA 13 6900 हा टेम्पो पोलिसांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता टेम्पोमध्ये वरती क्रेट टाकून खाली रक्तचंदनाचे 32 ओंडके ठेवण्यात आले होते. त्यामध्ये 2 कोटी 85 लाख 45 हजारांचे रक्तचंदन असल्याचं निदर्शनास आलं. हे रक्तचंदनच आहे, याची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी आणि वन विभागानं ते सर्व ओंडके ताब्यात घेतले. हे रक्त चंदन नेमकं आलं कुठून? याचा तपास सांगली पोलीस करत आहेत.
सध्या पुष्पा चित्रपटाची सगळीकडे हवा आहे. आंध्र प्रदेशमधील जंगलातून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी कशी केली जाते? यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. मात्र सांगलीच्या मिरजेत रक्तचंदनाच्या तस्करीची खरीखुरी भांडाफोड झाली आहे. या रक्तचंदनाची किंमत दोन कोटी 45 लाख 85 हजार असून वजन 1 टन इतकं आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात रक्तचंदनाचा हा ट्रक दाखल झाला. पोलिसांनी कारवाई करत यातील ट्रक चालक यासिन इनायतउल्ला खानला अटक केलं आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणातील हे रक्तचंदनाचे ओंडके कुठे नेले जात होते? यामागचा पुष्पा कोण? याची माहिती पोलिसांना अजून मिळालेली नाही. दुसरीकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या रक्तचंदनाबद्दल अधिक माहिती देत, याचा वापर औषधासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात, असल्याची माहिती दिली आहे. सांगलीमध्ये प्रथमच रक्तचंदनाच्या तस्करीवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे कर्नाटकमार्गी सांगली आणि सांगलीतून या अति दुर्मिळ रक्तचंदन तस्करीचे धागेदोरे कुठंपर्यंत आहेत? याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha