एक्स्प्लोर

हातपाय घट्ट बांधले, तोंडात बोळे कोंबून निवृत्त शिक्षिकेला संपवलं, मैत्रिणीसोबत फिरायला जाणाऱ्या जोशी बाईंच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला

Ratnagiri Crime: दुसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी आता चिपळूण पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत .संशयित आरोपीला आज चिपळूण न्यायालयात हजर केलं जाणार आहे

Ratnagiri crime:  रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे सेवानिवृत्त शिक्षकेचा राहत्या घरीच खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती . या हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरले होते .वर्षा वासुदेव जोशी असे 68 वर्षीय हत्या झालेल्या शिक्षिकेचं नाव आहे .  घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली व एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं  आहे . आता 48 तासानंतर पोलिसांना या हत्येचं गुढ उकडण्यास यश आले आहे .  जोशी बाईंना फिरण्याची आवड होती त्यांच्या आवडीचा फायदा घेत टूर प्लान करणाऱ्या एजंटच हा खून केल्याचं तपासात उघड झाले आहे .पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेत या खून प्रकरणाची माहिती दिली .

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव भालचंद्र गोंधळेकर असे आहे .त्याचा अजून एक साथीदार जयेश याचाही तपास सुरू आहे .दुसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी आता चिपळूण पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत .संशयित आरोपीला आज चिपळूण न्यायालयात हजर केलं जाणार आहे .

नेमकं प्रकरण काय ?

वर्षा जोशी या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या .गुरुवारी (7 ऑगस्टला ) मैत्रिणींसोबत हैदराबादला फिरण्यासाठी त्या जाणार होत्या .त्यासाठी मैत्रिणींचा वारंवार फोन आला मात्र तो न उचलल्याने मैत्रिणीने शेजारच्यांशी संपर्क साधला .आणि हत्येचा थरार समोर आला . बेडरूमचे दार उघडताच पाय बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती .त्यांच्या अंगावरील कपडे फाटलेले स्थितीत होते चेहऱ्यावर व्रण दिसत होते . वर्षा जोशी यांच्याकडील दागिने आणि पैसे यांच्या हव्यासापोटी हा खून झाल्याचं निष्पन्न झालं आहे .मृत महिलेच्या घरातील सीसीटीव्ही, डीव्हीआर व संगणकावरील हार्ड डिस्क पोलिसांनी आरोपीकडून जप्त केली असून आरोपी हा ट्रॅव्हल एजंट असल्याचं समोर आलं आहे . 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयश्री गोंधळेकर हा काही वर्षांपूर्वी सातारा येथे नोकरी करत होता .जयेशला कम्प्युटर मधील चांगले ज्ञान असून निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांची हत्या करून त्याने सीसीटीव्ही फुटेज, डीव्हीडीआर कम्प्युटर मधली हार्ड डिस्क गायब केली होती .हा सगळा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे .इतकच नाही तर निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी आणि जयेश यांचे अनेकदा कॉल असत .याच ट्रॅव्हल एजंट च्या माध्यमातून जोशी यांनी अनेकदा प्रवास केला आहे त्यामुळे जयश्री वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला होता .मात्र हा अनाठायी विश्वास शेवटी जीवघेणाच ठरला .

टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजंटनंच केला घात

संशयीत आरोपी जयेश हा चिपळूण पाग परिसरात राहत होता .तो टूर्स अँड ट्रॅव्हल एजंट असल्यामुळे जोशी यांच्या संपर्कात आला .निवृत्त शिक्षिका असणाऱ्या जोशी बाईंनी यापूर्वी आसाम पुणे अशा अनेक ठिकाणी प्रवास केला होता .त्यामुळे आता मैत्रिणी सोबत हैदराबाद सहलीसाठी निघणार होत्या .यावरून त्यांच्याकडे खूप पैसे व दागिने असतील या उद्देशाने जयेश गोंधळेकर यांनी एका साथीदाराच्या मदतीने त्यांना संपवण्याचा प्लॅन केला .राहत्या घरात त्यांच्या तोंडात कपड्याचे बोळे कोंबले .गळा दाबून खून केला व हातपायही बांधून ठेवण्यात आले होते .

गुरुवारी सकाळच्या सुमारासमोर आलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली होती .घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी तसेच इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .व त्यानंतर एका पथकाने युद्ध पातळीवर तपास करत आरोपीस पकडले .त्यामुळे पोलीस दलाचेही कौतुक होत आहे .आता दुसरा आरोपी नक्की कधी पकडला जातो व त्याच्याकडून या प्रकरणाला काय वळण मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : मुंडे कुटुंबात नवा वाद, Dhananjay-Pankaja यांच्यावर करुणा शर्मांचे गंभीर आरोप
Zero Hour: मुंडे वारसा वाद, करुणा शर्मांच्या दाव्यावर प्रकाश महाजन यांचं प्रत्युत्तर!
Zero Hour : गोपीनाथ मुंडेंच्या वारशावरून पुन्हा वाद, मामा प्रकाश महाजन मैदानात
Zero Hour : बीडमध्ये 'बाप चोरणारी टोळी' आली का? मुंडे मामांचा थेट सवाल  ABP Majha
Zero Hour : मुंडे भाऊ-बहिणीच्या नात्याचा राजकीय प्रवास ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला
भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2025 | रविवार
Embed widget