एक्स्प्लोर

बीडमध्ये सुपारी फेकणारे 8 जण ताब्यात; पोलीस अधीक्षकांना राज ठाकरेंचा सवाल, इंटेलिजन्स नाही का?

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर मनसेनंही आता आक्रमक पवित्रा घेतला असून सुरुवात तुम्ही केलीय, आता शेवट आम्ही करू, असे म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशाराही दिलाय.

बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मराठवाडा दौऱ्याला काही ठिकाणी विरोध होत असून आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या विधानावरुन मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान असलेल्या बीड जिल्ह्यात आज राज ठाकरेंचा ताफा आला असता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकून जोरदार आंदोलन केलं. राज ठाकरे यांचे बीड (Beed) शहरामध्ये आगमन झाल्यानंतर मनसैनिकांनी मोठ्या पुष्पहारासह बीडस्टाईल त्यांचं स्वागत केलं. मात्र, काही वेळातच, उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या फेकून चले जाव, अशा घोषणाही केल्या. त्यानंतर, राज ठाकरे यांनी पोलीस (Police) अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत विचारणा केली आहे. तसेच, यापुढे खबरदारी घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत. 

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर मनसेनंही आता आक्रमक पवित्रा घेतला असून सुरुवात तुम्ही केलीय, आता शेवट आम्ही करू, असे म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशाराही दिलाय. आता, राज ठाकरे यांनी बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत विचारणा केली आहे. राज ठाकरे यांनी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस उपअधीक्षक विश्वंभर गोल्डे यांना हॉटेलमध्ये बोलावून घेत ही घटना घडण्यापूर्वी आपले इंटेलिजन्स नव्हते का?, असा प्रश्न विचारत अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको होती, अशी खंत देखील व्यक्त केली. दरम्यान, भविष्यात असे प्रकार होऊ नये, त्यासाठी खबरदारी घ्या, अशा सूचनाही राज ठाकरे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना केल्या आहेत. 

बीडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची कार अडवल्यानंतर मनसे शहराध्यक्ष करण लोंढे आणि शैलेश जाधव या दोघांनी या आंदोलनावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे काही काळ मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला, यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांचा शर्ट सुद्धा फाटल्याचं दिसून आलं. दरम्यान, केवळ राजकीय विरोधातून हा प्रयत्न झाला याचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही असे  मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.

आम्ही सुद्धा बीडवरून सुरुवात केलीय शेवट मुंबईत करू - गणेश वरेकर

राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी गाडी अडवल्यानंतर संदीप देशपांडे यांनी सुरुवात उद्धव ठाकरे गटाने केली आता शेवट आम्ही करू असं म्हटले होते, त्यावर आम्ही बीडमधून सुरुवात केली आणि शेवट मुंबईत करू असा पलटवार शिवसेनेचे बीड जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांनी केला आहे. त्यामुळे, शिवसेना आणि मनसेतील हा वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा

Video: बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवून गाडीवर सुपाऱ्या भिरकावल्या, मराठा आंदोलक अन् ठाकरेंच्या शिवसैनिक आक्रमक

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget