Raigad Crime : माजी जिल्हा कृषी सभापतीच्या कारचालकाची गोळ्या झाडून हत्या; म्हसळा तालुका खूनाच्या घटनेने हादरला
Raigad Crime News : रायगड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बबन मनवे यांचे वाहन चालक निलेश ढवळे यांच्या वर गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Raigad Crime रायगड : रायगड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बबन मनवे यांचे वाहन चालक निलेश ढवळे हे गेल्या काही दिवसापासून बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. परिणामी 28 मे रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नी यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत पुढील तपास सुरू केला. मात्र दोन दिवस उलटून सुध्दा पोलिसांना निलेश यांच्या शोध घेण्यास यश आले नाही. तसेच त्यांचे बेप्पाता होण्या मागचे कारणही स्पष्ट झाले नाही. अखेर पोलिसांनी निलेश यांच्या सोबत फिरणारे आणि त्यांचे मित्र अक्षय गोलांबडे याचा तपास सुरू केला असता, या तपासात निलेश यांना त्यांच्याच मित्राने गोळी झाडून (Raigad Crime) मारल्याच तपासात समोर आले. या घटनेमुळे परिसरात मात्र एकच खळबळ उडाली असून या हत्येमागील नेमकं कारण काय? हे अद्याप कळू शकलेले नाही. सध्या या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.
हत्येनंतर पुरावे मिटवण्याचा प्रयत्न
रायगड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बबन मनवे यांचे वाहन चालक निलेश ढवळे हे 28 मे रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नी यांनी म्हसळा पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र दोन दिवस उलटून सुध्दा निलेश यांच्या बेप्पाता होण्या मागचे कारण स्पष्ट न झाल्याने अखेर पोलिसांनी निलेश यांच्या सोबत फिरणारे आणि त्यांचे मित्र अक्षय गोलांबडे याचा तपास सुरू केला. या तपासात निलेश याला त्याच्याच मित्राने गोळी झाडून मारल्याच चित्रं समोर आले. त्यानंतर मृतदेहाला दगडाने बांधून एका डोहा मध्ये ढकलून हे कृत्य लपवण्याच प्रकारही त्यांनी केलाय. पोलिसांनी केलेल्या तपासात हे कृत्य त्यांनी केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेहाच शोध सुरू
आज पहाटे 2 ते 4 वाजताच्या दरम्यान वांगणी येथील डोहात तपास करताना श्रीवर्धन कोलाड येथील रेस्क्यू टीमला निलेश याचे कपडे आणि जिवंत 4 काडतुसे सापडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यात त्यांचा मृतदेह अद्याप मिळलेला नसून पहाटे पासून पुन्हा रेस्क्युला शुरुवात झाली आहे. सध्या पोलीस रेस्क्यू टीमच्या मदतीने निलेश यांचा मृतदेहाच शोध घेत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या