Pramod Kondhare : पुण्यात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या भाजप नेत्यावर पोलिसांनी कोणती गुन्हेगारी कलमं लावली?
Pramod Kondhare Molested Police Woman : पुण्याच्या शनिवार वाड्याजवळ भाजप नेता प्रमोद कोंढरेने महिला पोलिस इन्स्पेक्टरचा विनयभंग केला. त्यानंतर त्याच्यावर पक्षाने कारवाई करत हकालपट्टी केली आहे.

पुणे : भाजपचा पुण्यातील नेता प्रमोद कोंढरे याने महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्यावर या आधीही पुण्यातील डेक्कन पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचसोबत खडक पोलिस स्टेशन आणि डेक्कन पोलिस स्टेशनमध्येही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील शनिवार वाड्याजवळ एका कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेऊन प्रमोद कोंढरे याने महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग केला. या महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर प्रमोद कोंढरेवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
प्रमोद विठ्ठल कोंढरेवर या आधी कोणते गुन्हे दाखल?
1) खडक पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 285/2015 IPC 385,506,507
2) विश्रामबाग पोलीस स्टेशन 336/2010 IPC 452, 143, 147, 149, 427, 506
3) विश्रामबाग पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 3140/2011 IPC 188, 34
4) डेक्कन पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 57/2022 IPC 354, 504, 506, 43
Pune BJP Pramod Kondhare : शनिवार वाड्याजवळ महिला पोलिसासोबत नेमकं काय घडलं?
भाजपचा पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरे याच्यावर एका महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते. त्यानंतर भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले.
त्यावेळी प्रमोद कोंढरे याने गर्दीचा फायदा घेऊन महिला पोलिस निरीक्षकाला दोन वेळा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला. त्यानंतर त्या महिला पोलिस अधिकाऱ्याने ही गोष्ट वरिष्ठांना सांगितली.
पोलिसांकडून त्या चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्यात आले. त्यामधून महिला पोलिस निरीक्षकाच्या आरोपांना पुष्ठी मिळाली. त्या महिला पोलिस निरीक्षकाने याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिली. त्यानंतर प्रमोद कोंढरेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रमोद कोंढरे याने एक पत्रक काढून त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा दावा केला. कोंढरे याच्यावर याआधी देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे .
ही बातमी वाचा:























