Pune : पुण्यात विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी, कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण; लोणी काळभोरच्या MIT कॉर्नरवरची घटना
Pune Crime : MIT महाविद्यालतील खाणावळीत सुरू झालेला हा राडा नंतर रस्त्यावर आला आणि त्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे या परिसरात दहशतीचं वातावरण आहे.
पुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी कॉर्नरजवळ विद्यार्थ्याच्या टोळक्याकडून तिघांना दगडासह लाठी काठीने कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली आहे. विद्यार्थ्याच्या टोळक्याने तिघांना दगडासह लाठी काठीने कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना एमआयटी कॉर्नर परिसरात असलेल्या ईस्ट हेवन सोसायटीजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हायरल होत आहे. वारंवार होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
मारहाण करणारे विद्यार्थी हे लोणी काळभोरच्या MIT महाविद्यालयातील असल्याची माहिती आहे. महाविद्यालयाच्या खानावळीत विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. त्यानंतर हा वाद रस्त्यावर आला आणि रस्त्यावरच या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीच्या वेळी एक दगड त्या ठिकाणी आलेल्या वृद्धालाही लागल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
समज देऊन सोडण्यात आलं
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि समज देऊन सोडल्याची माहिती आहे. जर या विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद झाला असता तर त्यांच्या करिअरवर परिणाम झाला असता. त्यामुळे पोलिसांनी केवळ समज देऊन त्यांना सोडल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांच्या हाणामारीच्या घटनेत सातत्याने वाढ
लोणी काळभोर जवळ शैक्षणिक संकुल आहे. या संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. काही विद्यार्थी संकुलाच्या वसतीगृहात राहतात. तर काही विद्यार्थी एमआयटीने संकुलाच्या बाहेरच्या परिसरात भाडेतत्वावरील घेतलेल्या वसतीगृहात राहतात. बरेच विद्यार्थी स्वत: फ्लॅट घेऊन मित्रांसोबत भाडेतत्वावर राहतात. त्यामुळे या परिसरात वादाच्या घटना नेहमीच होत असल्याची माहिती आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मारामारीच्या या घटनांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतंय.
ही बातमी वाचा: