Pune Drugs Case : पुणे ड्रग्जच्या विळख्यात? नामांकित मॉलमध्ये ड्रग्स सेवन; दोन तरुणींचा व्हिडीओ व्हायरल
Pune Drugs Connection : व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुणी ड्रग्स सेवन करताना दिसत आहेत. पुणे-नगर रस्त्यावरील मॉलमधील हा व्हिडीओ असल्याचं समजतंय.
पुणे : पुण्यातील L3 बार ड्रग्स पार्टी प्रकरण उघडकीस आलं असताना आता मॉलमधील ड्रग्स सेवन करतानाचा नवीन व्हिडओ समोर आला आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स सेवन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तसाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचं दिसत आहे. पुणे-नगर रस्त्यावरील एका मॉलमध्ये दोन तरुणी ड्रग्स सेवन करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुणी ड्रग्स सेवन करताना दिसत आहेत. पुणे-नगर रस्त्यावरील मॉलमधील हा व्हिडीओ असल्याचं समजतंय.
नामांकित मॉलमध्ये ड्रग्स सेवन
या व्हिडीओवरुन पुन्हा एकदा पुण्यातील ड्रग्स कनेक्शन समोर येताना दिसत आहे. यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सेवन होत असल्याचं दिसून येत आहे. पुण्याला ड्रग्सचा विळखा पडल्यचा आरोप अनेक वेळा विरोधक, सामाजिक संघटना आणि संस्थांकडून आरोप होतात. पण, गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील जे व्हिडीओ व्हायरल झाले आहे, त्यावरुन हे प्रकरण किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होताना दिसत आहे.
दोन तरुणींचा व्हिडीओ समोर
हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचं समोर आलं आहे. मात्र, आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एफसी रोडवरील एल3 म्हणजेच लिक्विड लेजर लाऊंज या पबमध्ये ड्रग्स पार्टी झाल्याचं समोर आल्यानंतर एका प्रथमदर्शीने त्यावेळी मॉलमधील ड्रग्स सेवनाचा व्हिडीओ समोर आणला आहे. या व्हिडीओ दोन तरुणी मोबाईलवर कोकेन सदृश्य अंमली पदार्थ ठेवून त्याचं सेवन करताना दिसत आहेत.
पुणे ड्रग्जच्या विळख्यात?
पुण्यातील FC रोडवरील L3 - Liquid Leisure Lounge मध्ये पहाटेपर्यंत पार्टी झालेल्या पार्टीमध्ये काहीजण ड्रग्जचे सेवन करताना दिसून आले. तो व्हिडीओ समाज माध्यमांवर झळकला. आता आणखी एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुणे-नगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलमध्ये असलेल्या पबमधील असल्याचा दावा करण्यात येत असून तो काही दिवसांपूर्वीचा आहे. व्हिडीओमध्ये तरुणी वॉशरूममध्ये ड्रग्जचे सेवन करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर त्यांचा व्हिडीओ काढणारी महिला त्यांना तुम्हाला ड्रग्ज कसे घ्यायचे, याचा फॉर्मुला सांगितला आहे. एकंदरीत पुण्यातील तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे असेच म्हणता येईल. पुण्यातील पबमध्ये असे प्रकार सुरु असल्याचे या व्हिडिओमधून दिसून येते.
Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओ
महत्त्वाच्या इतर बातम्या :