एक्स्प्लोर

Pune Crime: आईने अल्पवयीन मुलीच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, क्राईम वेब सीरिज पाहून आधी भोसकलं नंतर पेट्रोल टाकून जाळलं

Pune Crime : पतीची हत्या करुन एक दिवस मृतदेह घरातच ठेवला आणि दुसऱ्या दिवशी रात्री सणसवाडी येथे नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिला. हा खून करायच्या आधी आई आणि मुलीनं अनेक क्राईम वेब सीरिज पाहिल्या होत्या.

Pune Crime: पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना (Pune Shocking Crime) घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रियकरासोबत मिळून महिलेने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जॅाय लोबो असं मृताचं नाव असून पत्नी सॅन्ड्रा लोबो (Sandra Johnson Lobo) आणि तिच्या मुलीचा प्रियकर ॲग्नेल कसबे (Agnel Joy Kasbey) यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर या ठिकाणी ही घटना घडली आहे (wife killed husband with help of minor girl's boyfriend

मुलीचं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी आणि स्वतःच्या प्रेम संबंधामध्ये अडथळा न येण्यासाठी (obstacle in the relationship) आईनेच मुलीच्या प्रियकराच्या मदतीने हा खून केला आहे. पतीचा खून करत पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. या प्रकरणी 230 सीसीटीव्ही तपासत पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

सॅन्ड्रा लोबो आणि जॅाय लोबो हे पतीपत्नी असून 17 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक अल्पवयीन मुलगी आहे. या मुलीचे ॲग्नैल कसबे नावाच्या मुलांसोबत प्रेमसंबंध होते. अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध असल्याचं समजल्यावर जॅाय लोबो याने पत्नी, मुलगी आणि तिचा प्रियकर या तिघांना मारहाण केली होती. त्यावरून जॅाय लोबो याचा तिघांनी मिळून घरात चाकूने खून केला आणि एक दिवस घरातच मृतदेह ठेऊन दुसऱ्या दिवशी रात्री सणसवाडीला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिला. 

क्राईम वेब सीरिज पाहून केला खून

आरोपी सॅन्ड्रा लोबो आणि मयत जॉन्सन लोबो यांच्यातही सॅंड्रा हिचे बाहेर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून वाद होत होते. त्यावरुन जॉन्सन तिच्या पत्नीला वारंवार मारहाण करायचा. तसेच मुलीच्या प्रेमसंबंधाबद्दल त्याला कळाल्यावर त्यांने त्याची पत्नी आणि मुलीला मारहाण केली होती. त्यामुळे सततच्या मारहाणीला कंटाळून आई आणि मुलीने जॉन्सन लोबोला संपवण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे जॅायचा खून करण्याआधी पत्नीने आणि मुलीने वेगवेगळ्या क्राईम वेब सिरीज पाहून कट रचला (Took Inspiration From Crime Web Series) आणि खून केला. पोलिसांना जळालेल्या मृतदेहाचा तपास केल्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणला. आरोपी पत्नी ही पतीचा खून केल्यावर ही नातेवाईकांना संशय येऊ नये म्हणून रोज त्याच्या फोनवरून स्टेटस अपडेट करत होती.

अल्पवयीन मुलीच प्रेमप्रकरण यशस्वी करण्यासाठी आईनेच मुलीच्या बापाचा खून करण्याची घटना विरळीच आहे. आता मात्र या प्रकरणाचा शेवट तुरुंगात होणार असून पतीची हत्या केल्याबद्दल पत्नीला शिक्षा होणार हे नक्की.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget