एक्स्प्लोर

Pune Crime News : पुण्यातील देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू

Pune Crime News : पुण्यातील देहूरोडमध्ये भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या रमेश रेड्डीवर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. यात रमेश रेड्डीचा मृत्यू झाला.

पुणे (पिंपरी चिंचवड) : राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्यानं घडत असल्याचं पाहायला मिळतं. पुण्यातील देहूरोडमध्ये एका भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. भाजपच्या मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचं नाव रमेश रेड्डी असं आहे.  

देहूरोडमध्ये गोळीबारचा थरार

भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असलेल्या रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून यात एकामागोमाग एक राऊंड फायर केलेत, यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्याना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं.  उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता,.

रमेश रेड्डीचे नातेवाईक मित्र परिवाराने हॉस्पिटलमध्ये आक्रोश करत जुना पुणे मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला. पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रमेश रेड्डीचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवण्यात आलाय, तर रमेश रेड्डीवर हल्ला झाल्याचं कारण पोलीस तपासात समोर येणार आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली..या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

देहुरोडला गोळीबार झाल्याची माहिती  मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जखमी अवस्थेतील रमेश रेड्डी यांना रुग्णालयात नेलं, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. गोळीबारामुळं रमेश रेड्डी यांचा मृत्यू झाला. 

पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार देहुरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत  सवाना चौक येथे अग्निशस्त्र वापरुन एकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचताच रमेश रेड्डी याच्यावर अज्ञात इसमंनी गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं. सवाना चौकातील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रमेश रेड्डीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथकं पाठवली असल्याची माहिती देखील विशाल गायकवाड यांनी दिली आहे. 

दरम्यान, या प्रकरणातील हल्लेखोर कोण होते? कोणत्या हेतूनं रमेश रेड्डी यांच्यावर गोळीबार झाला, या सर्व गोष्टींचा तपास पिंपरी चिंचवड पोलिसांना करावा लागलणार आहे.   

महत्त्वाच्या बातम्या

पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Embed widget