Pune crime News: अंमली पदार्थ विकणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना बेड्या; 'हा' अंमली पदार्थ पहिल्यांदाच जप्त
कोंढवा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये अंमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी परदेशी नागरिकांना अटक केली आहे. आरोपींवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News : कोंढवा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या (Crime News) छाप्यांमध्ये अंमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी परदेशी नागरिकांना अटक केली आहे. आरोपींवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (NDPS) कायद्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचप्रमाणे गुन्हेगारी आणि ड्रग्ज तस्करही वाढत आहेत. कोंढवा परिसरात अमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कॅथा एड्युलिस फर्टिलायझर हा अंमली पदार्थ पहिल्यांदाच जप्त केला.
पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पुणे शहर पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी अमली पदार्थ तस्करांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील अंमली पदार्थ विक्रेते आणि अवैध धंद्यांची माहिती मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार पहिल्या छाप्यात, अंमली पदार्थ विरोधी पथक कोंढवा हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना यांना 21 मार्च रोजी एक विदेशी नागरिक जवळच्या सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. उंड्री येथील एका परदेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि 23 ग्रॅम 130 मिलीग्राम कोकेन, एक मोबाईल फोन, 4,62,600 किमतीची एक दुचाकी आणि 75000 रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 5,47,600 रुपयांचा माल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. कोकेन बेकायदेशीर ताब्यात असल्याचे आढळून आले आणि त्याने हे अंमली पदार्थ परदेशी भागीदाराकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या छाप्यात, कोंढवा परिसरातील राहत्या घरी एक विदेशी नागरिक अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोंढवा बुद्रुक येथे छापा टाकण्यात आला. एका परदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 8,73,510 रुपये किमतीचे 08 किलो 393 ग्रॅम कॅथा एड्युलिस फर्टिलायझर, इतर अंमली पदार्थ 5,87,510 रुपये, 2,70,000 किमतीचे विदेशी चलन आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या ताब्यातून 15,000 रुपये आणि एक हजार रुपये किमतीचा वजनकाटा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.