Rupali Chakankar: मयुरी हगवणेच्या पत्राने कोंडी, रुपाली चाकणकरांवर टीकेची झोड, म्हणाल्या, महिला आयोगाने 24 तासांमध्ये....
Vaishnavi Hagawane Pune Crime: वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे यांना हुंड्यात 51 तोळे सोने आणि फॉर्च्युनर गाडी दिली होती.

Vaishnavi Hagawane Pune Crime: वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात पुणे पोलीस आणि राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू मांडली आहे. मयुरी हगवणे यांच्या पत्रावर राज्य महिला आयोगाने 24 तासांमध्ये कारवाई करत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, असे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी शनिवारी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत याबाबत सविस्तर माहिती दिली.
या व्हिडीओत रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, वैष्णवी हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोगाने घटना घडल्यानंतर स्यूमोटो याचिका दाखल केली. वैष्णवी हगवणे यांनी राज्य महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार केली नव्हती. मयुरी हगवणे यांच्या बंधूंनी मेघराज जगताप यांनी 6 तारखेला तक्रारीचा मेल केला होता, त्यानंतर 7 तारखेला महिला आयोगाने बावधन पोलीस ठाण्याला पत्र पाठवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याच दिवशी एफआयआर दाखल झाली होती. तर दुसरीकडे त्याच दिवशी मयुरी हगवणे यांची नणंद करिश्मा हगवणे यांनीही तक्रार दाखल केली होती. करिश्मा हगवणे यांची तक्रार मयुरी हगवणे यांच्याविरोधात होती. ही तक्रार देखील बावधन पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आली. करिश्मा हगवणे यांचे म्हणणे काय, ते ऐकून घ्या आणि अहवाल सादर करा, असा सूचना बावधन पोलिसांना देण्यात आल्या होत्या. दोन्ही महिलांनी तक्रार केली होती, हा कौटुंबिक वाद होता. एकाच कुटुंबातील दोन क्रॉस कम्प्लेंट होत्या, त्यानुसार एफआआयर दाखल केले. मात्र, मयुरी हगवणे यांनी सहा तारखेला पत्र पाठवले आणि 24 तासांत एफआयआर दाखल करण्यात आली. 24 तासांच्या आता राज्य महिला आयोगाने कारवाई केली, असे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.
Pune Crime News: मयुरी हगवणेंच्या भावाच्या पत्रात गंभीर आरोप, सासऱ्याने छातीला हात लावला अन्....
मयुरी जगताप हिची आई आणि भावाने राज्य महिला आयोगाला लिहिलेले सहा महिन्यापूर्वी एक पत्र पाठवले होते. या पत्रात हगवणे कुटुंबीयांकडून त्यांच्या मुलीवर होत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला होता. माझी मुलगी मयुरी सुशील हरवणे हीचे 20 मे 2022 रोजी सुशील राजेंद हगवणे रा. भुकुम ता. मुळशी यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर लग्नाच्या काही कालावधी नंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे व सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फ़ॉच्यूनर पाहिजे व पैसे पाहिजे, असा मोठ्या गाड्यांच्या व रोख रकमेची मागणी करूण तिला त्रास देऊ लागले. तुला, तुझ्या अपंग भावास व आईस आम्ही मारहाण करू. आमच्याकडे बंदुका आहेत. काही वाकड करू शकत नाही. माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे. आमच्या मागे मोठा राजकीय पाठींबा आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते.
आम्ही पौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी समाज देऊन मध्यस्थी केली. त्यानंतर सासू व सासऱ्यांनी तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करू लागले. त्याच्या पतीचा या गोष्टीस नकार असल्याने त्याचा राग हा मुलीवर काढत होते. दि. 06/11/2024 रोजी तिचे पती घरी नसताना सासू, सासरे, दीर व नणंद यांनी तिला मारहाण केली. तिचे कपडे फाडले. मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला व दिराने मुलीच्या अवघड जागी लाथ मारली. तुला मुलगा होत नाही तर आमच्या कडे ये या भाषेत मुलीला शिवीगाळ केला. हे सर्व होत असताना मुलीने मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग चालू केले होते. हे कळताच तिचा दीर शशांक राजेंद्र हगवणे यांनी तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला, असेही या पत्रात म्हटले होते.
आणखी वाचा























