एक्स्प्लोर

सशस्त्र दरोडेखोर बांधकाम व्यवसायिकाच्या घरात घुसले, हातपाय बांधले, खोलीत कोंडले अन्.. पुण्यात दरोड्याचा थरार

या घटनेत किती रक्कम चोरीला गेली ?सोनं नाणं केलंय का ?दरोडा नेमका कसा पडला ?याचा तपास सुरू आहे .

Pune crime: पुण्यातून वारंवार गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. दिवसाढवळ्या होणाऱ्या हाणामाऱ्या, कोयत्याची दहशत,घरफोडी अशा अनेक घटना समोर येत असताना पिंपरी चिंचवड मधून सशस्त्र दरोड्याचा थरार समोर आलाय. पुण्याच्या पिंपरी चिंचवड मध्ये एका बांधकाम व्यवसायिकाच्या घरी चार-पाच दरोडेखोरांनी व्यावसायिकाचे हातपाय बांधून दरोडा टाकला .रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती . दरोडेखोरांनी घरातील रोकड रकमेसह लाखोंचा किमती ऐवज लंपास केला आहे .

चंद्रभान छोटूराम अग्रवाल असं बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे .निगडी प्राधिकरण परिसरात ते राहतात .घटनेच्या वेळी रात्री ते घरात एकटेच होते .हॉलमध्ये बसले असताना बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडा होता .अचानक चार-पाच सशस्त्र दरोडेखोर घरात घुसले .दरोडेखोरांनी नोकरचा चाकरांसह व्यवसायिक अग्रवाल यांनाही हातापायाला बांधून खोलीत डांबले . रात्री नऊच्या सुमारास हा संपूर्ण थरार घडला .

नेमकं घडलं काय?

प्रत्यक्षदर्शिनी दिलेला माहितीनुसार,पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिकाच्या घरी चार-पाच दरोडेखोर शिरले .दरोडेखोरांनी आधी नोकरांचे हातपाय बांधून त्यांना एका खोलीत डांबले .बांधकाम व्यवसायिक चंद्रभान यांचेही हातपाय बांधून त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले होते .हा सगळा प्रकार सुरू असताना व्यवसायिक चंद्रभान यांनी समय सूचकता दाखवत गॅलरीत येऊन आरडा ओरड केली .मदतीसाठी आसपासच्या लोकांना हाका मारल्या .त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे .दरम्यान हात बांधलेल्या अवस्थेत मदतीसाठी हाका मारणाऱ्या व्यवसायिकाचा व्हिडिओ ही समोर आला आहे . जीवाचा आकांताने मदतीसाठी हाका मारणाऱ्या व्यावसायिकाला बघून अनेक लोक त्याच्या मदतीसाठी धावून गेले .दरोडेखोर हत्यार बंद असल्याचे कळल्याने आत मध्ये जाण्याची कोणाची हिंमत झाली नाही .त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली .माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले .मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते . रात्री उशिरापर्यंत बांधकाम व्यवसायिकाच्या बंगल्यासमोर पोलिसांचा ताफा उभा होता .अनेक नागरिकांची गर्दी देखील होती . पोलीसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास  सुरू केला आहे .या घटनेत किती रक्कम चोरीला गेली ?सोनं नाणं केलंय का ?दरोडा नेमका कसा पडला ?याचा तपास सुरू आहे .दरम्यान पोलीस अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .

हेही वाचा

Chhattisgarh Naxal: छत्तीसगडच्या अबूजमाडच्या जंगलात 46 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या सहा माओवाद्यांना कंठस्नान; मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि स्फोटके जप्त करण्यात यश

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget