एक्स्प्लोर

वाढदिवस सेलिब्रेट करताना रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली, बर्थडे बॉय महाडिकांच्या छातीत घुसली अन्... इंदापूरातील धक्कादायक घटना

Pune Crime: सध्या त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाढदिवसासाठी एकत्र जमले असताना पिस्तूलातून सुटलेल्या गोळीने एक जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

Pune Crime: इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जगदाळे फार्म हाऊसवर परवानाधारक पिस्टल हाताळताना निष्काळजीपणामुळे गोळी सुटल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (24 मे) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख ( टेंभुर्णी, माढा) असे आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाढदिवसासाठी एकत्र जमले असताना पिस्तूलातून सुटलेल्या गोळीने एक जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

नक्की घडले काय?

पुण्यात इंदापूरमधील जगदाळे फार्मवरती वाढदिवसासाठी  परवाना असलेलं पिस्टल हलगर्जीपणाने हाताळल्याने त्यातून सुटलेल्या गोळीतून एक जण जखमी झालाय. काल सायंकाळी चार वाजताच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील जगदाळे फार्महाऊस वरती ही घटना घडलेली आहे. सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत.यानंतर इंदापूर पोलिसांनी आता चौघांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केलाय. प्रदीप  जगदाळे, सुधीर महाडिक, विजय पवार आणि राजकुमार पाटील अशी गुन्हा दाखल झालेली यांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जगदाळे फार्महाउस वर सुधीर महाडिक देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने हे सर्वजण एकत्र आले होते. याच वेळी राजकुमार दिलीपराव पाटील यांच्याकडील परवानाधारक पिस्टल सुधीर महाडिक देशमुख हातळत होते. आणि याच वेळी या पिस्टलमधून गोळी सुटली ती थेट सुधीर महाडिक यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली यामध्ये ते जखमी झाले. त्यांच्यावर सध्या पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून बंदुकीची रिकामी पितळी पुंगळी,एक हुक्का कप पाईप, एक पत्यांचा सेट मिळाला असून पोलिसांनी फरशी वरती पडलेले रक्ताचे नमुने देखील घेतलेले आहेत. इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Solapur Crime: स्वतःच्या आईसोबतचे अनैतिक संबंध उजेडात आल्यानं नराधम बापाने पोटच्या चिमुरडीला संपवलं, सोलापूर हादरलं

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget