एक्स्प्लोर

पुण्यात पुन्हा वैष्णवी... नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट फर्निचरसाठी पैसा; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन

तिचा पती हर्षल सूर्यवंशी वारंवार या ना त्या कारणाने तिला टॉर्चर करत होता, अलीकडेच त्याने दिव्याच्या कुटुंबीयांकडे सोन्याच्या अंगठीची मागणी ही केली होती.

Pune crime news : पिंपरी चिंचवड शहरात हुंड्याच्या छळामुळे पुन्हा एका वैष्णवीचा बळी गेला आहे. दिव्या हर्षल सूर्यवंशी वय 26 वर्ष या विवाहित महिलेने नवरा आणि सासरच्या कुटुंबाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे नवरा आयटी अभियंता असल्याची आणि शिक्षकांचा मुलगा असल्याचं बोललं जातंय. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील उच्चभ्रू सोसायटीत काल संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे.  राहत्या घरात दिव्या सूर्यवंशी हिचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला आहे.  मात्र दिव्याने आत्महत्या केली नसून तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळीने तिचा खून केल्याचा आरोप दिव्याच्या माहेरच्या नातेवाईकानी केला आहे. 

नेमकं प्रकरण काय ?

मूळची धुळे जिल्ह्यातील तसेच शेतकरी कुटुंबातील असलेली दिव्या भाऊसाहेब खैरनार ही उच्चशिक्षित असून तिचा विवाह जवळपास तीन वर्षांपूर्वी हर्षल शांताराम सूर्यवंशी या आयटी इंजिनीयर तरुणांशी झाला होता. लग्न झाल्यानंतर दिव्या आपल्या पती हर्षलसोबत वाकड येथील उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. मात्र तिचा पती हर्षल सूर्यवंशी वारंवार या ना त्या कारणाने तिला टॉर्चर करत होता, अलीकडेच त्याने दिव्याच्या कुटुंबीयांकडे सोन्याच्या अंगठीची मागणी ही केली होती. तसेच घरातील फर्निचर बनवण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावून दिव्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

महिलेच्या कुटुंबीयांचा आरोप काय ?

दिव्याच्या जाण्याने तिच्या आईसह कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय .  दिव्याच्या आईने सांगितलं, " त्यांनीच केलं सगळं . माझी मुलगी कधीच असं टोकाचे पाऊल उचलणारी नाही .त्यांनी मारलंय माझ्या मुलीला .त्यांनीच या सर्व गोष्टी केल्यात . ती मला अनेकदा सांगायची सासरचे टोचून बोलतात .पण आपल्याकडे असं चालत नाही सहन करायचं थोडं असं मी तिला समजावत होते . आज थांबतील उद्याच थांबतील म्हणत होतो तर त्यांच्या मागण्या संपतच नव्हत्या. लग्न ठरलं त्यावेळेस 40 तोळे सोनं त्यांनी मागितलं .आम्ही ही पोरगी सुखात राहील पुण्यात चांगली राहील म्हणून लगेच साखरपुडा ठरवला .साखरपुड्याचे पाच लाख रुपये दिले . लगेच लग्न लावलं .वीस लाख रुपये खर्च केला .आम्ही शेतात कापड कष्ट करणारे लोकं आहोत . माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी मृतविवाहितेच्या आईने सरकारकडे केली आहे .

सासरच्या जाचाला कंटाळून दिव्याची आत्महत्या

हा जाच तिला असह्य झाला. यातूनच 27 वर्षीय दिव्याचा जीव गेला. त्यामुळं या प्रकरणात आता दिव्याचा पती हर्षल शांताराम सूर्यवंशी आणि तिच्या सासरच्या मंडळी विरोधात दिव्याचे कुटुंबीय वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी हजर झाले आहेत. दिव्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हर्षल आणि त्याच्या कुटुंबीयांना विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृतक दिव्याच्या नातेवाईकांनी केली आहे. 

नोकरी न करण्यावरून मानसिक व शारीरिक छळ

हर्षल सूर्यवंशीने लग्नाच्या सहा महिन्यानंतर दिव्याला त्रास द्यायला सुरुवात केली . असा एकही दिवस गेला नाही की आज काय झालं हे सांगणारा .मी केवळ तिची वहिनी नाही लहानपणापासून आम्ही सोबत वाढलोय . मी तिची मामी बहीणही आहे .  नोकरी न करण्यावरून सासरच्यांनी अनेकदा दिव्याला टोमणे मारले .नवीन घर घेतल्यानंतर या या टोमण्यांमधून मागण्यासमोर येऊ लागल्या .माहेरचांकडून फर्निचर करून घे .घरात टीव्ही -फ्रीज आणून दे  असे वारंवार टोचून बोलणे सुरू झाले . दिव्याला शारीरिक मानसिक दोन्ही प्रकारचा छळ सहन करावा लागल्याचं तिच्या माहेरच्या लोकांकडून सांगण्यात येत आहे .मृतदेहावरही अनेक मारल्याच्या खुणा दिसत असल्याचं मृत विवाहितेच्या वहिनेने सांगितलं .

आधी मारहाण केली, नंतर फाशीवर चढवलं,नातेवाईकांचा आरोप

सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेतलेल्या दिव्याच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलेत.आधी दिव्याला मारहाण करून नंतर त्यांनीच फासावर लटकवलं असल्याचं दिव्याच्या माहेरचं म्हणणं आहे. लग्नानंतर सहा महिन्यांनी हर्षल सूर्यवंशी ने दिव्याला त्रास द्यायला सुरुवात केली .सातत्याने पैसे मागणे,मला सोनं करून द्या,नवीन फ्लॅटसाठी फर्निचर करून द्याअशा मागण्या सुरू केल्या.दिव्याला नोकरी मिळत नसल्याने ही नवऱ्यासह सासू-सासरे ननंद मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचा समोर आला . लग्नाच्या तीन वर्षांपासून हा छळ सातत्याने होत होता . असं देवेंद्र खैरनार (दिव्याचा भाऊ ) याने सांगितलं .

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
Uddhav Thackeray:हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले, 'मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट...'
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Suniel Shetty Majha Maha Katta : ...म्हणून मी लग्नानंतर चित्रपट करण्याचं ठरवलेलं
Suniel Shetty Majha Maha Katta :तब मुझे डर लगा.... सुनील शेट्टींनी सांगितला पहिल्य चित्रपटाचा किस्सा
Suniel Shetty Maha Majha Katta : सुनील शेट्टीने सांगितला फिटनेस फंडा, डायटीशनचीही गरज नाही
Jaya Kishori Majha Maha Katta : प्रेरणा देणाऱ्या प्रवचनांच्या अभ्यासाची तयारी जया किशोरी कशा करतात?
Jaya Kishori Majha Mahakatta : अभ्यासात गणित विषय कधीच आवडला नाही - जया किशोरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
Uddhav Thackeray:हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले, 'मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट...'
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले...
Eknath Shinde: एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
3 Indian Territories on Nepal Currency: आता टीचभर नेपाळ सुद्धा आगळीक करु लागला! भारताच्या थेट तीन भागांवर दावा, नोटांवरही वादग्रस्त नकाशा छापला
आता टीचभर नेपाळ सुद्धा आगळीक करु लागला! भारताच्या थेट तीन भागांवर दावा, नोटांवरही वादग्रस्त नकाशा छापला
Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
Embed widget