Pune Crime News : जवळच्या मैत्रिणीनेच केली तब्बल 69 लाखांची फसवणूक; नेमकं काय घडलं?
अडचण असल्याचं सांगून मैत्रिणीला कर्ज घेण्यास भाग पाडलं. त्यानंतर कर्जाचे काही हफ्ते भरले आणि नंतर हप्ते न भरता तब्बल 69 लाखांची फसवणूक केली आहे.

Pune Crime News : मागील काही दिवसांपासून (Pune Crime News) पुण्यात गुन्हेगारीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यातच खंडणी आणि फसवणुकीच्या घटनादेखील वाढत आहे. अशातच मैत्रीनेच घात केल्याचा प्रकार समोर आला आहे. अडचण असल्याचं सांगून मैत्रिणीला कर्ज घेण्यास भाग पाडलं. त्यानंतर कर्जाचे काही हफ्ते भरले आणि नंतर हप्ते न भरता तब्बल 69 लाखांची फसवणूक केली आहे. त्यानंतर माझे काका पोलीस आहेत. ते सगळं बघून घेतील अशा धमक्यादेखील मैत्रिणीला दिल्या. या प्रकरणी 39 वर्षीय महिलेने पोलिसांत धाव घेतली त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. शशीकांत वसंत लोणकर (वय 56 ), सुशिल वसंत लोणकर, उत्तम शेळके यांच्यासह 3 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला अडचणीत असल्याचं सांगितलं त्यानंतर तिच्या नावावर कर्ज घेण्यासाठी सांगितलं. त्या मैत्रिणीने कर्ज घेतलं. त्यानंतर काही महिने अडचणीत असलेल्या मैत्रिणीने हफ्ते भरले मात्र त्यानंतर हफ्ते भरायला नकार दिला. पीडित मैत्रिणीला दर महिन्याला 1 लाख 70 हजार रुपयांचा हप्ता भरावा लागत आहे. मैत्रिणीने 69 लाखांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
हफ्ता मागायला गेल्यावर दिली धमकी...
या सगळ्या प्रकारानंतर पीडित महिला मैत्रिणीकडे दाद मागायला गेल्या असतात. त्यांनी मारुन टाकण्याची धमकी दिली. माझे काका पोलीस आहे, ते पाहून घेतील, असं सांगण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. फिर्यादीने राहिलेले पैसे परत मागितले असता त्यांना धमकाविण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघीही मैत्रीणी एकाच सोसायटीमध्ये राहतात. मला अडचण आहे तर मला मदत कर आणि 50 ते 60 लाखांची गरज आहे. त्यामुळे कर्ज घे. मी सगळे हफ्ते भरेन. मला कर्ज मिळत नसल्याने मदत मागत असल्याचंही सांगितलं आणि 80 लाखांचं कर्ज काढलं. फिर्यादीच्या मैत्रिणीने तिला माझा काका सुशिल लोणकर हा समर्थ पोलीस ठाण्यात पोलीस आहे. त्यांना तुझे नाव सांगेन, अशी धमकी दिली
मारहाण केली....
पैसे मागायला गेले असता. त्यांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी यांनी सुशिल लोणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तू तिला दिलेले पैसे विसरुन जा. तुला काय कायदेशीर कारवाई करायचे आहे, ती कर असे उत्तर दिले आणि मैत्रिणीच्या घरी गेल्या असता. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना खाली पाडून केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
