(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime news : भावनांची ऐशीतैशी! मुलाचा मृत्यू झालाय, विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’ वाजवू नका म्हटल्याने कुटुंबाला कोयत्याने मारहाण
काही दिवसांपूर्वी मुलाचे निधन झाले असल्याने घरासमोरून गणपतीची मिरवणूक जाताना डीजे वाजवू नका म्हटल्याने21 जणांनी काट्या, कोयते, लोखंडी सळईने, लाथा बुक्यांनी एका कुटुंबाला मारहाण केली.
पुणे : सोमाटणे फाटा येथील गणेश नगर परिसरात मंगळवारी (Pune koyta gang) मिरवणुकीत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजे सिस्टीमचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने एका 37 वर्षीय व्यक्तीसह त्याच्या कुटुंबीयांना कोयते आणि लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गणेश मंडळाच्या 21 जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने गणेश मंडळाच्या सदस्यांना आपल्या मुलाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने परिसरात डीजे यंत्रणा वाजवू नये, अशी विनंती केली होती. कुटुंबावर शोककळा पसरल्याने ही विनंती करण्यात आली होती. आरोपींनी पुढे जाऊन विसर्जन करून घरी परतत असताना त्यांच्यापैकी काही जणांनी फिर्यादीच्या घरात घुसून मारहाण केली. पीडितेची आई, वडील, भाऊ आणि मध्यस्थी करणाऱ्या मित्रावरही आरोपींनी लाकडी दांडके, चाकू आणि इतर हत्यारांचा वापर करून मारहाण केली. या घटनेत ते सर्वजण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी एकूण 21आरोपींना अटक केली. त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 135, 37(1). अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
कोयता गँगची दहशत आता शाळांपर्यंत...
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोयता गँगची दहशत आता शाळांपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं. पुण्यातील (Pune) नूतन मराठी विद्यालयात शिकणाऱ्या 17 वर्षांच्या एका विद्यार्थ्यावर दोन तरुणांनी शाळेच्या (Pune school) बाहेर कोयत्याने हल्ला चढवला होता. या विद्यार्थ्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात हल्ल्ला करणारा एक तरुणही जखमी झाला होता. कोयत्यांच्या वापर आता शाळांच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचल्याने सगळ्यांकडूनच चिंता व्यक्त करण्यात आली होती.
कोयता गँगची दहशत
कोयता गँगने पुणे पोलिसांना पळता भुई सोडली आहे. रोज हल्ले, केक कापणं यात धिंड काढल्यानंतर आता पुणे पोलिसांनी आता DB ब्रांच आणि बिट मार्शलला पिस्तुल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या सगळ्या खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असं असलं तरीही कोयता गँगला रोखणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. मात्र शहरातील गुन्हेगारी कधी कमी होईल का?, कोयता गँगला आळा कधी बसेल का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-