Pune Murder : पुण्यात आंदेकर-कोमकर गँगवॉर पुन्हा भडकले, रिक्षा चालकाला भरदिवसा कोयत्याने संपवलं
Pune Gang War Murder : आंदेकर टोळीच्या आयुष कोमकरची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी अनेक जणांना अटक केली होती. त्यानंतर आता कोमकर गटाशी संबंधित गुंडाच्या भावाची हत्या करण्यात आली

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune Murder) पुन्हा एकदा गँगवॉरमधून एकाची हत्या करण्यात आली आहे. कोंढवा भागात गणेश काळे या रिक्षा चालकाचा गोळीबार आणि कोयत्याने वार करुन त्याची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर आरोपी फरार झालेत. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून (Andekar Komkar Gang War) ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हत्या झालेला गणेश काळे हा कोमकर टोळीचा सदस्य असलेल्या समीर काळेचा भाऊ आहे. समीर काळे हा वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे. त्यामुळे ही हत्या गँगवॉरमधून झाल्याची चर्चा आहे.
Pune Andekar Gang : आंदेकर टोळी अजूनही सक्रिय
आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आल्यानंतर टोळी प्रमुख सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर सह अनेकांना अटक करण्यात आली होती. मात्र तरीही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचं या हत्येतून दिसून येतंय.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या समीर काळेचा भाऊ हा गणेश काळे आहे. त्यामुळे त्याच्या हत्येमागे गँगवॉर आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
गेल्या वर्षी वनराज आंदेकरची हत्या कोमकर गँगकडून करण्यात आली होती. त्यानंतर त्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आंदेकर गँगचा प्रमुख बंडू आंदेकर आणि त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली आहे. मात्र तरी देखील ही हत्या होत असेल तर आंदेकर टोळी अजूनही सक्रिय आहे आणि ते पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असेल.
Pune Andekar Komkar Gang War : आंदेकर-कोमकर गँग वॉर काय?
1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठमध्ये राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली. या प्रकरणात गणेश कोमकर, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि इतरांसह 21 आरोपींना अटक करण्यात आली.
वनराज आंदेकरच्या हत्येनंतर संतापलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याच्या अंत्यविधीवेळी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली होती. त्याचाच एक भाग म्हणून 1 सप्टेंबर 2025 रोजी प्लॅनही आखला होता. वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपींची रेकी करण्यात आली होती. पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हा प्लॅन उधळला.
गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आरती झाल्यानंतर नाना पेठेमध्ये गोळ्यांचा आवाज झाला. एकीकडे एका गणेश मंडळामध्ये डीजे सुरू होता, त्यामध्ये 'टपका रे टपका, एक ओर टपका' हे गाणं सुरू होतं. त्याचवेळी दुसरीकडे आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांच्या भाच्याला म्हणजे आयुष कोमकरला ठार केलं. या घटनेनंतर पोलीस कारवाई सुरू आहे.
ही बातमी वाचा:


















