एक्स्प्लोर

Pune crime: जमिनीचा वाद टोकाला, सख्ख्या भावानं 83 वर्षीय भावाचा काटा काढला, बाजरीच्या शेतातच मृतदेह पुरला

Pune Crime: हत्या केल्यानंतर मृतदेह बाजरीच्या शेतातच पुरून दिला. मात्र, मृतदेह सापडल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Pune Crime: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मावडी गावात सख्ख्या भावानेच आपल्या 83 वर्षीय भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे.

नेमकं  घडलं  काय?

1 ऑगस्ट रोजी मयत ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय 83) यांचा मृतदेह मावडी गावातील बाजरीच्या शेतात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. या मृत्यूमागे काहीतरी गूढ असल्याची शक्यता लक्षात घेता जेजुरी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूला मारहाणीचे कारण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मृत ज्ञानदेव भामे आणि त्यांचा सख्खा भाऊ चांगदेव लक्ष्मण भामे (वय 68) यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून जमिनीच्या मालकीवरून वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला की चांगदेव भामे यांनी अखेर संतापाच्या भरात आपल्या मोठ्या भावाचा खून केला. पोलिसांनी आरोपी चांगदेव भामे याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, जमिनीच्या वादातूनच हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं आहे. आरोपीने मृताच्या डोक्यावर आणि अंगावर घाव घालून त्याचा खून केल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेनं मावडी गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून सख्या  भावांनी हा टोकाचा पर्याय निवडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

प्रकरणाचा अधिक तपास सुरू

पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, न्यायालयात आरोपीला हजर करण्यात येणार आहे. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांनी आधी भावाला शेतात बोलावून नेलं, त्यानंतर त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून जागीच ठार मारलं. हत्या केल्यानंतर मृतदेह बाजरीच्या शेतातच पुरला. मात्र, मृतदेह सापडल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. जेजुरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर भादंवि कलम 302 आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Delhi Murder Mystery: आशिकच्या प्रेमाखातर नवऱ्याला मारून नाल्यात फेकलं; हत्येसाठी दाजींच्या भावाला गाडी विकून 50 हजाराची सुपारी

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget