एक्स्प्लोर

Pune Car Accident : न्यायालयासमोर हात जोडून उभे होते विशाल आणि शिवानी अग्रवाल, कोर्टाने 14 जूनपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

Pune Car Accident : विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल हे दोघेही कोर्टात हात जोडून उभे होते. आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अश्फाक मकानदार या तिघांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात (Pune Porsche Car Accident) प्रकरणी विशाल अग्रवाल (Vishal Agrawal), शिवानी अग्रवाल आणि अश्फाक मकानदार या तिघांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालचा मुलाचे रक्ताचे सॅम्पल कुठे फेकले? ते सॅम्पल नेमके कुणी फेकले? यात अजून कोणी सहभागी आहेत का? याची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. केसच्या मुळाशी जाणे गरजेचे नाहीतर चुकीचा संदेश जाईल, असं म्हणत ही कोठडी वाढवून देण्यात आली आहे. या चार दिवसातील तपासात काही नवीन गोष्ट समोर येण्याची शक्यता आहे. नव्या गोष्टी समोर आल्या तर आरोपींना पुन्हा  कोर्टात हजर केलं जाऊ शकतं आणि त्यांची पुन्हा एकदा चौकशी होऊ शकते.

विशाल, शिवानी, मकानदारला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल यांच्यासह अश्फाक मकानदार या तिघांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालच्या मुलाचे रक्ताचे सॅम्पल कुठे फेकले? ते सॅम्पल नेमके कुणी फेकले? यात अजून कोणी सहभागी आहेत का? याची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. 

कोर्टात काय घडलं?

पुण्यातील पोर्शे कार प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अश्फाक मकानदार या तिघांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल हे दोघेही कोर्टात हात जोडून उभे होते. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवालने आम्हाला फक्त एम सी आर मिळाला तर बरं होईल, असं म्हणताच एम सी आर म्हणजे काय?, असं कोर्टानं विचारलं. त्यावेळी विशाल अग्रवालच्या आईने माहिती नाही, असं उत्तर दिलं.

पोलिसांचा पुढील तपास कसा असेल?

रक्ताचे नमुने बदलण्यासाठी 4 लाख रुपये दिले, मात्र 3 लाख रुपये श्रीहरी हळनोरकडून पोलिसांना मिळाले. त्यातले एक लाख कुठे गेले? आता पोलीस हे एक लाख रुपये कुठे गेले याचा शोध घेणार  आहेत. आरोपी अश्फाक मकानदार गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. त्यादरम्यान त्याला कुणी मदत केली का? तो कुठे वास्तव्यास होता? याचा तपास पोलीस करणार आहेत. अश्फाक  मकानदार याला अग्रवाल दांपत्याने कामाचा मोबदला म्हणून काही आर्थिक फायदा पोहोचविला आहे का? याचा शोध पोलिस घेणार आहेत.

विशाल आणि शिवानी अग्रवालवर पोलिसांचा संशय

विशाल आणि शिवानी अग्रवाल यांनी रक्ताचा नमुना पुरावा नष्ट केल्याचा दाट संशय पोलिसांना असून, हा रक्त नमुना कुठे आणि कसा नष्ट केला कुणाच्या सांगण्यावरून केला याबाबत तपास पोलिस करणार आहेत. अश्फाकने कुणाच्या सांगण्यावरून अग्रवाल दाम्पत्याला मदत केली? याचा शोध पोलिस घेणार आहेत. आरोपी विशाल हा आश्फाक, डॉ. तावरे आणि डॉ श्रीहरी संपर्कात असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. 

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime news: मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे अन्...; बीड तुरुंगातील ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटलांचा संताप, थेट इशारा
तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे अन्...; बीड तुरुंगातील ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटलांचा संताप, थेट इशारा
धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलगा ठार, मित्रांसोबत आंबे पाडायला गेलेल्या कृष्णावर वन्यजीवाचा हल्ला
धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलगा ठार, मित्रांसोबत आंबे पाडायला गेलेल्या कृष्णावर वन्यजीवाचा हल्ला
Madha Clash : ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं

व्हिडीओ

Mumbai Worli Traffic : मुंबईत ट्रॅफिकला ब्रेक, महिलेचा उद्रेक Special Report
Beed Walmik Karad News Audio Clip : वाल्मिक कराड गँगची तुरुंगात पुन्हा दहशत?
Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime news: मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Ulhasnagar Clash : उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का?  जाणून घ्या कधी पैसे काढता येतात? प्रक्रिया काय असते? 
सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का? प्रक्रिया काय असते? 
Sukesh Chandrashekhar : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Baramati Byelection 2026 Sunetra Pawar: अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या...
अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या...

Embed widget